सातारा | कुंभारगाव विभागातील मोरेवाडी (चिखलेवाडी,ता. पाटण) येथे आज सकाळी चार पायाचे कोंबडीचे पिल्लू जन्माला आल्याने परिसरात तो कुतुहलाचा विषय बनला आहे. कोंबडीच्या
इतर पिल्लांबरोबर इकडून-तिकडे पाळणारे हे चार पायाचे पिल्लू सर्वांचे लक्ष वेधून घेत असून अनुवांशिक दोषामुळे घडलेला हा दुर्मिळातील दुर्मिळ प्रकार असंल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
याबाबतची माहिती अशी, मोरेवाडी येथील वसंत विठ्ठल मोरे यांच्याकडे अनेक गावठी कोंबड्या असून तीन आठवड्यांपूर्वी त्यांनी घरच्या कोंबडीची १३ अंडी खुडक्या कोंबडीखाली उबवत ठेवलेली होती.कालपासून त्यातून पिल्ले बाहेर येण्यास सुरुवात झाली.आज सकाळी एका अंड्यातून चक्क चार पायाचे पिल्लू जन्माला आल्याचे पाहून मोरे कुटुंबियाना आश्चर्याचा धक्काच बसला. ही बातमी गावात समजताच चार पायाचे कोंबडीचे पिल्लू बघायला कुतूहलापोटी ग्रामस्थांनी गर्दी केली.पिल्लाला पुढे दोन व पाठीमागे दोन पाय असून चारही पाय मजबूत आहेत. इतर पिल्लाबरोबर हेही पिल्लू दुडदूड धावत आहे.दरम्यान ‘आनुवंशिक दोषातून हा प्रकार घडला असून ती एक दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याचे सहायक पशुसंवर्धन आयुक्त डॉ.दिनकर बोर्डे व निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजीराव पाटील यांनी सांगितले.
डॉ.शिवाजीराव पाटील ते म्हणाले,’अशी घटना क्वचितच कानावर येते.चारही पाय सुस्थितीत असले आणि पिल्लू व्यवस्थित चालून-फिरून असेल तर ते जगुन मोठेही होऊ शकते. यापूर्वीही काही ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत.”
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’