एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

pune suicide
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र् ऑनलाईन । एकाच कुटुंबातील चौंघांनीही आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune) घडली आहे. मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. पुण्यातील मुंढवा (Mundhwa) परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसलं तरी पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव घेत याप्रकरणी तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिपक थोटे (59), इंदू दिपक थोटे (45) मुलगा ऋषिकेश दिपक थोटे (24) मुलगी समीक्षा दिपक थोटे (17) अशी आत्महत्या केलेल्या चौघांची नावे आहेत. दोन महिन्यापूर्वी ते मुंढवा भागातील केशवनगर परिसरात वास्तव्यास आले होते. त्यांच्या फ्लॅट शेजारी राहणाऱ्या लोकांना दरवाजा बंदच असल्याने संशय आला. यानंतर त्यांनी केशवनगर पोलीस ठाण्यास कळवले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दरवाजा उघडला. त्यावेळी संपूर्ण प्रकरण समोर आलं .

आर्थिक नुकसान झाल्याने थोटे कुटुंबाने हे पाऊल उचललं आहे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे . पोलिसांनी चौघांचे मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीकरिता ससून रुग्णालयात पाठविले आहेत. तसेच कुटुंबातील चौघांनीही नेमकी का आत्महत्या केली? याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र या घटनेने संपूर्ण पुणे हादरलं आहे.