फसवणुकीचा गुन्हा ः दोन बोगस डाॅक्टरांना पोलिस कोठडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर | सोलापूर जिल्ह्यातील माळकवठे येथे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल देसाई आणि तालुका वैद्यकीय अधिकारी दिगंबर गायकवाड हे कोरोना नियंत्रण बैठकीसाठी गेले होते. बैठकीत ग्रामस्थ सूचना मांडत होते. यावेळी एकजण प्रशासनावर सूचनांचा भडिमार करत होता. तेव्हा या इसमाची ओळख विचारली असता, तो माळकवठे गावात गेली पंधरा वर्षे वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे सांगितले. तेव्हा त्याची डिग्री गटविकास अधिकारी यांनी तपासून तो बोगस असल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हसनसाब मुजावर असे या बोगस डाॅक्टरांचे नांव आहे.

हसनसाब मुजावर हा गेल्या पंधरा वर्षांपासून गावात वैद्यकीय व्यवसाय करत आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी उत्सुकतेपोटी त्याचे क्लिनिक तपासण्याची इच्छा व्यक्त केली. क्लिनिकमध्ये औषधे, इंजेक्शन्स, पीपीइ कीट आदी साहित्य आढळून आले. वैद्यकीय पदवीची विचारणा केली असता डॉक्टरांची बोबडीच वळली. थातूरमातूर उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. तगादा लावल्याने नॅचरोपॅथी पदविका प्रमाणपत्र दाखविण्यात आले. अशा प्रमाणपत्रधारकांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करता येत नाही याकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले. याच पद्धतीने गावातील विश्वनाथ अळलीमोरे यांच्याही बाबतीत तोच प्रकार घडला.

गटविकास अधिकारी राहुल देसाई यांनी या दोन्ही डॉक्टरांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Leave a Comment