औरंगाबाद ।सोन्या-चांदीचे दागिने घडवनाऱ्या बंगाली कारागिराने दोन सराफा व्यावसायिकांचा विश्वास संपादन करून सुमारे ८० तोळे सोने घेऊन पोबारा केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी फरार कारागीर शेख असहुल शेख लियाकत (रा. मोमीनपुरा, मूळ गाव मालबा, जि. वर्धमान, पश्चिम बंगाल) याच्याविरोधात १७ मार्च रोजी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिडकोतील अजय गोवर्धनदास मेवलानी (४५, रा. प्लॉट क्र. ५४०, एन-३) यांची कासारी बाजार आणि मुलमची बाजार अशा दोन ठिकाणी दुकाने आहेत. त्यांची शेख असदुल याच्याशी चार ते पाच वषार्पूर्वी ओळख झाली होती. या ओळखीतून मेवलानी हे नेहमी शेखकडे सोन्याचे दागिने घडवण्यासाठी द्यायचे. त्यानंतर घडवलेले दागिने चार ते पाच दिवसांत शेख आणून द्यायचा. त्यानंतर ठरल्यानुसार त्याला मजुरी दिली जायची. अशात ५ मार्च रोजी सायंकाळी मेवलानी यांनी त्याला सोन्याचे बिस्किट, लगड आणि दुरुस्तीसाठी म्हणून तब्बल ५४ तोळ्यांचे दागिने दिले होते. मात्र, हे दागिने घेतल्यावर शेख त्यांच्याकडे फिरकलाच नाही.
बरेच दिवस वाट पाहून मेवलानी यांनी शेख याचे मोमीनपुरा भागातील घर गाठले. तेव्हा तो घरी नव्हता, त्याचा मोबाइलसुद्धा बंद होता. अशाच प्रकारे आणखी एका सराफा व्यापाºयाने त्याला २६ तोळ्यांचे दागिने दिले होते तेही त्याने परत केलेले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मेवलानी यांच्यासह अजून एका सराफा व्यावसायिकाने सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group