जान फाऊंडेशनकडून मोफत सॅनिटायझर फवारणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड शहरातील जान फाऊंडेशन कडून मोफत सॅनिटायझर फवारणी करण्यात आली आहे. पालिका व पोलिस प्रशासनावर ताण येत आहे. तेव्हा कोरोनापासून लोेकांचा बचाव करण्यासाठी तसेच शासकीय यंत्रणेला मदत म्हणून सॅनिटायझरची फवारणी करण्यात येत असल्याचे जान फाऊंडेशनचे अध्यक्ष जावेद नायकवडी यांनी सांगितले

शहरातील पोलिस वसाहत, कराड तालुका व शहर पोलिस चाैकी या ठिकाणी सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली आहे. या उपक्रमात रमझान बागवान, शरद चव्हाण, समीर नायकवडी, जमीर सय्यद, सुप्रिया शेख यांनी सहभाग घेतला.

जावेद नायकवडी म्हणाले, आमचे जान फाऊडेशन प्रशासनाला नेहमीच सहकार्य करणार आहोत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत व संचारबदीच्या काळात आम्ही खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला जाईल. शहरातील अन्य ठिकाणीही लोकांच्या हितासाठी आमचे फाऊंडेशन कार्यरत राहील.

You might also like