पंढरपूर सारख्या पवित्र ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येता कामा नाही – निलेश राणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिवंगत नेते भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आले असून दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केली असून त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते प्रचारात उतरले आहेत. याच दरम्यान भाजप नेते निलेश राणे यांनी थेट राष्ट्रवादीवरच हल्लाबोल केला आहे.

पंढरपूर सारख्या पवित्र ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येता कामा नाही. खुनी, भ्रष्टाचारी, वसुलीखोर, बलात्कारी आणि हिंदू विरोधी ताट मानेने राष्ट्रवादी उमेदवाराचा प्रचार करतायत. पंढरपूर महाराष्ट्राचं श्रद्धेचं ठिकाण आहे तिथे ह्या बदमाशाना जागा मिळता कामा नये. अशी जहरी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

दरम्यान पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघात यंदा जोरदार लढाई पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कडून भारत भालके यांचे सुपूत्र भगीरथ भालके याना उमेदवारी देण्यात आली असून त्यांना भाजपच्या समाधान अवताडे यांचं कडवं आव्हान असणार आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment