सरकारच्या तिजोरीत ठणठणाट; शेतकऱ्यांनो कर्जमाफीच्या आशेवर राहू नका : मंत्री राजेंद्र शिंगणेंच वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली असताना आता अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशात कर्ज कशा प्रकारे फेडायचं? असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे. राज्य सरकारकडून यंदाही कर्जमाफी दिली जाईल, अशी आशा त्यांना लागली असताना अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी आज एक वक्तव्य केलं आहे. “सध्या राज्य सरकारच्या तिजोरीत ठणठणाट असून शेतकऱ्यांनी कर्जमाफी होईल या आशेवर राहू नये,” अस मंत्री शिंगणे यांनी म्हंटल आहे.

अगोदरच कोरोनामुळे मृत्यूचं प्रमाण वाढलं असताना सरकारने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकत आला नाही. त्यात वाढवलेल्या खतांच्या, बिबियांणाच्या दरामुळे जादा पैसे देऊन शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला. बॅंका, पतसंस्था यातून कर्ज काढून शेतकऱ्यांनि पिके मोठी केली. मात्र, पुन्हा चक्री वादळाने त्यांच्या पिकांचे आतोनात नुकसान केले. अशात आता यंदा तरी सरकारकडून आपल्याला नुकसान भरपाई दिली जाईल. व आपल्यावरील कर्जाचे डोंगर हलके होईल, अशी आशा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. मात्र, त्यांच्या आशेवर पाणी फिरवणारे वक्तव्य मंत्री शिंगणे यांनी केलं आहे.

मंत्री शिंगणे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता भाजपकडून पुन्हा महाविकास आघाडी सरकारला टार्गेट केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अगोदरच वाढणारे कोरोनाचे प्रमाण, पडणारा औषधांचा तुटवडा यामुळे भाजपकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. आता मंत्री शिंगणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जाणार हे नक्की.