‘खडसे काकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत त्यांच्या सूनबाईंनाचं विचारा; प्रीतम मुंडेंचा स्ट्रेट ड्राईव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड । ‘खडसे काकांचा निर्णय योग्य वेळ आल्यावरच कळेल, राष्ट्रवादी प्रवेशाबाबतचा प्रश्न त्यांच्या खासदार सूनबाई रक्षा खडसे यांना विचारा, असे म्हणत बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी गुगली टाकली. त्या बीड येथे बोलत होत्या. एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला राज्यात उधाण आले आहे.

खडसे येत्या घटस्थापनेला राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असं भाकितही राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येत आहे. बीडमध्ये पत्रकारांनी खासदार प्रीतम मुंडे यांना खडसे प्रकरणावर प्रश्न विचारले. प्रीतम मुंडेंनी हा प्रश्न त्यांच्या खासदार सूनबाई रक्षा खडसे यांना विचारायला हवा असं सांगत खडसेंवर बोलण्यास नकार दिला. खडसे काका यांचा निर्णय योग्य वेळ आल्यावर कळेलच असंही त्या म्हणाल्या. यावेळी मुंडे आणि खडसे कुटुंबाचे जवळचे स्नेह असल्याने प्रीतम मुंडेंना खडसेंच्या संभाव्य पक्षांतरवर प्रश्न विचारण्यात आला होता.

घटस्थापनेला खडसे राष्ट्रवादीत?
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे येत्या घटस्थापनेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी आपल्या व्हॉटसअॅपला तसे स्टेटस ठेवले आहेत. यामध्ये ‘तुमचे राष्ट्रवादीत स्वागत आहे’, ‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’, असा मजकूर पाहायला मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशासाठी वातावरणनिर्मिती करत असल्याचा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.

त्यानंतर विधानपरिषेदवर राज्यपालनियुक्त सदस्य म्हणून राष्ट्रवादीतर्फे त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. विधानपरिषेदवर लवकरच राज्यपालनियुक्त 12 सदस्यांची नियुक्ती होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे यांच्यासारखा अभ्यासू आणि फर्डा वक्ता विधानपरिषदेवर गेल्यास राष्ट्रवादी काँग्रेसची सभागृहातील बाजू आणखी भक्कम होईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment