‘दानवे प्रीतमचा फॉर्म भरायला आले, ती जिंकली, माझ्यावेळी आलेचं नाहीत, मी हरले’; पंकजा मुंडेंचा सॉल्लिड टोला

औरंगाबाद । औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या शिरीष बोराळकरांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. त्यानंतर पंकजांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पंकजांची बहीण प्रीतम मुंडे या दुसऱ्यांदा भाजपच्या तिकीटावर बीड मतदारसंघातून खासदार आहेत. दानवेंचा दौरा हा शुभशकुन असल्याचे सांगत पंकजांनी एकप्रकारे शिरीष बोराळकरांना विजयाची हमी दिली.

“रावसाहेब दानवे खासदार प्रीतम मुंडे यांचा फॉर्म भरायला आले आणि प्रीतमताईंचा विजय झाला, पण आमदारकीवेळी माझा फॉर्म भरायला आले नाहीत, मी पराभूत झाले” असं म्हणत पंकजा मुंडे यांनी रावसाहेब दानवे यांना गमतीत टोला लगावला. ”भाजप हा माझ्या बापाचा पक्ष आहे आणि त्याचा मला अहंकार नाही, तर प्रेम आहे. त्यामुळे माझ्या बापाच्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार”, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

“एका व्यक्तीचं तिकीट कापून मी शिरीष बोराळकर यांच्या कार्यक्रमाला आले, त्यामुळे जो काही मेसेज द्यायचा तो मी दिला आहे. सर्व वर्गांना समान न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे. माझ्यावर पक्षाचे आणि बापाचे संस्कार आहे. त्यामुळे मी पूर्ण काम करेन” अशी ग्वाही पंकजा मुंडेंनी दिली. “तिकीट देण्यावरुन मतं व्यक्त केली, आणि मत आम्ही कानात बोलत नाही, जाहीर बोलतो, प्रवीण घुगे यांनी पक्षाच्या आदेशाने अर्ज भरला होता, एखाद्या वेळेस अर्ज बाद झाला तर उमेदवार असावा म्हणून भरला आहे” असं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : http://www.hellomaharashtra.in

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook