‘काळजी करू नका! OBC आरक्षणाला धक्का लागू देणार नाही’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यात मराठा आरक्षणावरून राजकारण तापलं असताना ओबीसी गटातील नेत्यांची आता आरक्षणावरून धाकधूक वाढत आहे. राज्यात मराठा आरक्षण आंदोलनं तीव्र होत आहे. अशा वेळी मराठा समाजाला आरक्षण देताना आपलं आरक्षण तर कमी होणार नाही न अशी भीती ओबीसी समाजाला वाटतं आहे. दरम्यान, राज्यातील ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळाला दिले. तसेच या समाजाचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती गठीत करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

आरक्षण कमी होणार नाही. या समाजाच्या मागण्यांची आणि प्रश्नांची आपल्याला जाणीव आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी व पाठपुरावा करून त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली जाईल. या समितीने ओबीसी समाजाच्या मागण्यांचा साकल्याने विचार करावा व जे निर्णय तात्काळ घेता येतील त्याची प्रक्रिया गतिमान करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या या बैठकीला अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, परिवहनमंत्री अनिल परब, जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, माजी आ. प्रकाश शेंडगे, ओबीसी समाजाचे, १२ बलुतेदार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment