चिंताजनक! जगातील प्रत्येक १०व्या व्यक्तीला कोरोनाची बाधा- WHO

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जिनिव्हा । जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) तज्ञांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे जगाची चिंता आणखी वाढली आहे. जगभरात प्रत्येक दहावा व्यक्ती कोरोनोबाधित असू शकतो असं WHOकडून सांगण्यात आलं आहे. याशिवाय जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या पॉझिटिव्ह असलेल्या एकूण संख्येच्या जवळपास २० टक्के अधिक असू शकते असंही WHOनं म्हटलं आहे. यासोबतच WHO ने भविष्यात कोरोनाची परिस्थिती अधिक गंभीर होण्याची चेतावनी दिली आहे.

WHO च्या डॉ. मायकल रियान यांनी म्हटलं आहे की,’हे आकडे गावात आणि शहरात वेगवेगळे असू शकतात. तसेच वेगवेगळी वयोमर्यादा देखील असू शकतात. यानुसार, जगभरातील अधिकांना कोरोनाची लागण झाली असेल. बैठकीत सांगितल्याप्रमाणे, महामारीचा संसर्ग अजूनही होत आहे. तसेच संक्रमणापासून वाचण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. या संक्रमणातून अनेकांचा जीव वाचला आहे.’

डॉ. रियान यांच्या म्हणण्यानुसार, साऊथ-ईस्ट एशियात कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती जास्त बिघडलेली आहे. यूरोप आणि पश्चिमच्या भागात डेथ रेट सर्वाधिक आहे. तर आफ्रिका आणि पश्चिम देशात कोरोनामुळे परिस्थिती सकारात्मक आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment