जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; CRPFचे २ तर १ पोलीस जवान शहीद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जम्मू काश्मीरच्या बारामुला जिल्ह्यात सुरक्षा दलावर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात काश्मीर पोलिसांच्या एका जवानाने तर सीआरपीएफच्या दोन जवानांनी आपले प्राण गमावलेत. दहशतवाद्यांनी बारामुलाच्या क्रेरी भागात हा क्रूर हल्ला केला. दहशतवाद्यांकडून सीआरपीएफ आणि पोलिसांच्या जॉईंट नाका टीमवर बंधुंद गोळीबार केला.

आयजी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हल्ल्यात जम्मू काश्मीर पोलिसांचे स्पेशल पोलीस अधिकारी घटनास्थळीच शहीद झाले. तर सीआरपीएफचे दोन जवान गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं परंतु, उपचारा दरम्यान सीआरपीएफच्या दोन्ही जवानांचा मृत्यू झाला’

यावेळी झालेल्या गोळीबारात काही सुरक्षा रक्षकांना गंभीर इजा झाली आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बारामुल्लातील क्रिरी भागात ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, हल्ला झालेल्या परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून येथे लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांवर दहशतवाद्यांनी केलेला हा गेल्या ३ दिवसातील दुसरा हल्ला आहे. १४ ऑगस्टला श्रीनगरमधील नवगाम भागात दोन पोलीस दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले होते. तर एकजण जखमी झाला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News

Leave a Comment