महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाही- देवेंद्र फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । महाराष्ट्र प्रदेश भाजपची कार्यकारिणीची बैठक आज पार पडली. या बैठकीत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर मराठा आरक्षणाच्या मुद्यावर निशाणा साधला. ”महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाही. कोणी काही बोलतंय, कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. आज मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोठा संताप आहे. केस दाखल केली नाही, म्हणून बेंचसमोर प्रकरण जाऊ शकत नाही आणि स्थगिती उठणार नाही. कधीकधी मला यांच्या मनातच काळंबेरं आहे, असं वाटतं. कारण यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाही असं दिसतंय. भाजपने केलेला कायदा वैध नसता तर हायकोर्टात मान्य झालाच कसा? यांच्या नाकर्तेपणाचा ठपका भाजपच्या माथी मारण्याचे काम ते करत आहेत” असं फडणवीस यांनी म्हटलं.

मराठा आणि ओबीसी समाजाला आमने सामने आणण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये ही भाजपची भूमिका आहे. मी स्वतः भोगलं आहे. महाराष्ट्र जळतो तेव्हा सरकार नाही सामान्य माणूस जळतो. आम्हाला हे उद्रेक नको आहेत. सनदशील मार्गाने आंदोलनं करा. आम्ही हा तिढा सोडवण्यासाठी सरकारसोबत आहोत. विरोधासाठी विरोध करणारा आम्ही विरोधी पक्ष नाही तर समाजाच्या हितासाठी लढणारा विरोधी पक्ष आहोत.

एमपीएससीची परीक्षा झाली पाहिजे की नाही यावर मार्ग काढणं हे सरकारचं काम आहे. झुलवत ठेवणं हे सरकारचं काम नाही. इथे कोणी बसायला, चर्चा करायलाच तयार नाही. हे सरकार नेमकं चालवतय कोण हेच कळत नाही. आंदोलनं करत राहा, आम्ही पोलिसांच्या माध्यमातून आंदोलनं चिरडू असा पवित्रा सरकारचा आहे. राज्य सरकारने विधिमंडळाच्या अधिकारांचा वापर करून मार्ग काढायचा असतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment