विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार निश्चित; एकनाथ खडसेंनाही मिळणार तिकीट?

मुंबई । महाविकासआघाडी सरकारकडून विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी अखेर नावे निश्चित करण्यात आली आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. एकूण 12 जागांपैकी ४ जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत.
यापैकी एका जागेवर भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसे यांना संधी मिळेल. तर उर्वरित तीन जागांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, गायक आनंद शिंदे आणि उत्तमराव जानकर यांनी संधी दिली जाणार असल्याचे समजते. (NCP finalized list of MLC members)

एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश जवळपास निश्चित असून त्यांच्यासमवेत आजी-माजी आमदार आणि पदाधिकारी जाणार आहेत. मुक्ताईनगर येथे झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याचे समजते. सोमवारी मुक्ताईनगर येथे बैठक झाली. त्यास धुळे जिल्ह्यातील शिवसेना, भाजपचे त्यांचे समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत ठरल्याप्रमाणे हा प्रवेश सोहळा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळं खडसेंनी पक्षानंतर प्रवेश केल्यास त्यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातील एका जागेवर उमेदवारी मिळणार असल्याचे समजते.

विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त जागांसाठी राष्ट्रवादीकडून आनंद शिंदे आणि राजू शेट्टी यांच्या नावाची अगोदरपासूनच चर्चा होती. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच राजू शेट्टी यांची भेट घेतली होती. त्यावेळी लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या समझोत्याप्रमाणे, विधानपरिषदेची एक जागा देण्याबाबत ठरले होते. त्याविषयी जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले होते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून राजू शेट्टी यांच्या नावाची शिफारस केली जाईल.

राज्यपालनियुक्त सदस्यासाठी काय असतात निकष?
कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे. राजकीयदृष्ट्या सोय पाहता अनेकदा हे निकष बाजूला ठेवले जातात. मात्र, कधी कधी राज्यपाल हे निकष पूर्ण करण्याचा आग्रह धरतात. अशा वेळी राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात संघर्ष होऊ शकतो.

महाराष्ट्रातील विधान परिषदेवरील राज्यपाल निर्देशित सदस्यांच्या 12 जागा रिकाम्या आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या वाट्याला 4 जागा येणार आहेत. काँग्रेस आपल्या राजकीय नेत्याला राज्यपाल निर्देशित उमेदवारी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com