वाढदिवशी रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना मागितलं ‘हे’ बर्थडे गिफ्ट

मुंबई । राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा उद्या २९ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. अनुषंगाने रोहित पवार यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ संदेश देत कार्यकर्त्यांना त्यांना हवं असलेले बर्थडे गिफ्ट मागितलं आहे.

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये रोहित पवार बर्थडे गिफ्ट मागताना लिहितात, ”माझा वाढदिवस उद्या असला तरी राज्यातील माझे मित्र, भाऊ-भगिनी व कार्यकर्त्यांनीगेल्या काही दिवसांपासूनच वेगवेगळ्या पद्धतीने तो साजरा करायला सुरुवात केलीय. आपल्या या आपुलकीच्या शुभेच्छांचा नम्रपणे स्वीकार करत असताना आपले आभार मानण्यापेक्षा आपल्या ऋणातच राहायला मला आवडेल. पण वाढदिवसानिमित्त मला आपल्या सर्वांकडून एक गिफ्ट हवंय. मी ते तुम्हाला हक्काने मागतोय आणि आपण ते मला नक्की द्याल असा मला विश्वास आहे. ते गिफ्ट कोणतं… यासाठी हा व्हिडिओ जरुर बघा…” असं म्हणत रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना व्हिडिओ पाहण्याचं आवाहन केलं आहे.

नेमकं काय गिफ्ट हवंय रोहित पवारांना, पहा व्हिडिओ.. 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook