वीस वर्षांनी सोलापूरकरांची प्रतीक्षा संपली; अखेर कारंबा उपसा सिंचन योजना कार्यान्वित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूरला उजनीच्या डाव्या कालव्यातून पाणी आणण्याची योजना वीस वर्षांपूर्वी आखली गेली आणि अखेर यंदा प्रत्यक्षात कार्यान्वित झाली. या प्रकल्पामुळे आजूबाजूच्या अनेक गावांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. हा आहे कारंबा उपसा सिंचन प्रकल्प. गेली 20 वर्ष हा प्रकल्प रखडलेला होता. राजकीय इच्छाशक्ती आणि निधी दोन्हींच्या अभावामुळे हा बंद होता. या प्रकल्पाची क्षमता 240 क्यूसेक इतकी असून 50 हजार हेक्टर क्षेत्र या प्रकल्पामुळे ओलिताखाली येणार आहे. तब्बल 20 वर्षांनी शेतकरी आणि जनसामान्यांची तहान भागणार आहे, सध्या दोन पंपावर प्रयोग यशस्वी झाला असून काही दिवसांत पूर्ण क्षमतेने म्हणजे 265 अश्वशक्तीच्या 6 पंपांनी हे पाणी उपसून हिप्परगा तलावात सोडले जाईल.

सोलापूर शहर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील नागरिकांचे लक्ष लागलेली महत्वाकांक्षी योजना रविवारी सायंकाळी प्रत्यक्षात उतरली आहे. उजनीचे पाणी आज हिप्परगा तलावात दाखल झाले. जलसंपदा विभागाने तयार केलेल्या योजनेच्या माध्यमातून हे पाणी हिप्परगा तलावात टाकण्याची चाचणी यशस्वी झाली आहे. सोलापूर शहर व परिसरातील पिण्याच्या पाण्याचा, सिंचनाचा मोठा प्रश्‍न येत्या काळात मार्गी लागणार आहे.

उजनीतून सोडलेले पाणी कारंबा शाखा कालव्यामार्गे हिप्परगा तलावात सोडण्यासाठी भोगाव हद्दीतील हिप्परगा तलावाच्या उजव्या बाजूस पंपहाऊस उभारण्यात आला आहे. या पंप हाऊसमध्ये 265 एचपीच्या सहा मोटर बसविण्यात आल्या आहेत. त्यापैकी दोन मोटर रविवारी सायंकाळी सुरु करुन चाचणी घेण्यात आली. गेल्या सात ते आठ वर्षांपासून जलसंपदा विभाग करत असलेल्या प्रयत्नांना आज यश मिळाले आहे.

Leave a Comment