धक्कादायक! इंदूरमध्ये मुंबईतील २ मॉडेलवर सामूहिक बलात्कार; इव्हेंटच्या बहाण्याने होते बोलावले

इंदूर । इव्हेंटमध्ये नृत्य सादर करण्यासाठी मुंबईहून इंदूरला बोलावलेल्या दोन मॉडेल्सवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिच्या चार साथीदारांना अटक केली आहे. इंदूरमधील बाणगंगा परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी २१ वर्षीय तरुणी आणि मुंबईची २२ वर्षीय तरुणी विजय नगर पोलीस ठाण्यात आल्या. मॉडेलिंग करत असल्याचे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी एका महिलेने फोन करून इंदूरमध्ये एका इव्हेंटमध्ये नृत्य सादर करण्याबाबत सांगितले आणि बोलावून घेतल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही तरुणी बसमधून १६ सप्टेंबरला इंदूरला पोहोचल्या. महिलेचा एक साथीदार तरूण त्यांना बाणगंगा परिसरातील एका इमारतीतील फ्लॅटमध्ये घेऊन गेला. इव्हेंट एक-दोन दिवसांत होईल असे महिलेने तरुणींना सांगितले.

इव्हेंटमध्ये नृत्य सादरीकरण करण्याबरोबरच काही व्यक्तींसोबत शारिरीक संबंध ठेवण्यासाठी आरोपी महिलेने तरुणींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तरुणींनी नकार दिल्यानंतर त्यांना डांबून ठेवण्यात आले. तसेच मारहाण करण्यात आली. त्यांना उपाशी ठेवले. त्यांच्या अंगावरील कपडे फाडून अश्लील व्हिडिओ काढले. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्यावर बलात्कार केला. उपाशी ठेवून त्यांच्यावर तीन दिवस अत्याचार केले. एका तरुणीची प्रकृती बिघडल्यानंतर सोमवारी त्यांना धार येथे पाठवण्यात आले.

तरुणींनी कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली. त्यानंतर त्या धार पोलीस ठाण्यात गेल्या. घडलेला प्रसंग तेथील अधिकाऱ्यांना सांगितला. मात्र, घटना इंदूरमध्ये घडल्याचे सांगत त्यांनी तरुणींना इंदूरला पाठवले. दरम्यान, तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या चार साथीदारांना अटक केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Get real time updates directly on you device, subscribe now.

x Close

Like Us On Facebook