SBI च्या 42 कोटी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 1 ऑक्टोबरपासून अशा व्यवहारांवर द्यावा लागणार Tax, जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी टॅक्सशी संबंधित माहिती ट्वीटवर शेअर केली आहे. किंबहुना परदेशात पैसे पाठविण्यावर कर वसूल करण्याबाबत केंद्र सरकारने एक नवीन नियम बनविला आहे. हे नियम 1 ऑक्टोबर 2020 पासून लागू होतील. अशा परिस्थितीत आपण परदेशात शिकणाऱ्या आपल्या मुलास पैसे पाठवत असाल किंवा एखाद्या नातेवाईकास आर्थिक मदत करत असाल तर त्या रकमेवर तुम्हाला अतिरिक्त 5% कर स्त्रोत (TCS) जमा करावा लागेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम (LRS) अंतर्गत फायनान्स अॅक्ट (Finance Act 2020) नुसार परदेशी पैसे पाठविणार्‍याला TCS भरावा लागेल.

या गोष्टींना सूट देण्यात आली आहे
या प्रकरणात सरकारने काही प्रमाणात सूट दिली आहे, त्याअंतर्गत परदेशात पाठविलेल्या सर्व पैशांवर हा कर लागू होणार नाही. तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी 7,00,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी पैसे पाठवल्यास TCS आकारला जाणार नाही. जर शैक्षणिक कर्ज हे 7,00,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर 0.5% TCS आकारले जाईल. तसेच कोणत्याही टूर पॅकेजसाठी परदेशात पाठविलेल्या रकमेवरही TCS लागू होणार नाही. कोणत्याही कामासाठी परदेशात पाठविलेल्या 7,00,000 किंवा त्यापेक्षा कमी रकमेवर TCS लागू होणार नाही, म्हणजे ही रक्कम यापेक्षा जास्त असल्यास TCS लागू होईल. मात्र, टूर पॅकेजेसच्या बाबतीत जास्त रकमेस देखील सूट देण्यात आली आहे.

म्हणून नियम बनवावे लागले
सरकारला हे नियम आणण्याची गरज का वाटली याविषयी केसीसी ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष शरद कोहली यांनी सांगितले की,’परदेशात अनेक प्रकारच्या पेमेंट्सवर TDS कट केला जातो. त्याचबरोबर गिफ्ट, उपचार, मालमत्तेत गुंतवणूक, नातेवाईकांची मदत, रुग्णालय यांना देण्यासाठी पाठविलेले पैसे हे TDS अंतर्गत येत नव्हते. या सर्वांना RBI च्या LRS अंतर्गत TDS मधून सूट देण्यात आली आहे. वास्तविक, कोणताही भारतीय RBI च्या LRS अंतर्गत वर्षाकाठी अडीच लाख डॉलर्स पाठवू शकतो. हे पैसे टॅक्सच्या रडारमध्ये आणण्यासाठी TCS घेण्याचा नियम बनविण्यात आला आहे. यात अनेक प्रकारचची सूटही देण्यात आली आहे. त्याशिवाय प्रत्येकाला 5 टक्के TCS द्यावे लागतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment