Sunday, June 4, 2023

1 जानेवारीपासून ATM मधून पैसे काढणे आणि जमा करणे महागणार, असे असणार नवीन दर

नवी दिल्ली । नवीन वर्षात ATM मधून मोफत पैसे काढण्याच्या मर्यादेनंतर पैसे काढल्यास तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त शुल्क द्यावे लागेल. 1 जानेवारी 2022 पासून, बँका ATM मधून मोफत पैसे काढण्याच्या मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी प्रति ट्रान्सझॅक्शन 20 रुपयांऐवजी 21 रुपये ट्रान्सझॅक्शन चार्ज आकारला जाईल.

आतापर्यंत बँक ग्राहकांना दर महिन्याला पाच वेळा ATM मधून पैसे काढण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. मोफत पैसे काढण्याची मर्यादा संपल्यानंतर पैसे काढल्यास, बँक प्रति ट्रान्सझॅक्शनसाठी 20 रुपये आकारते. मात्र 1 जानेवारीपासून सहाव्यांदा पैसे काढल्यावर तुम्हाला 21 रुपये शुल्क द्यावे लागेल आणि त्यावर टॅक्स जोडावा लागेल. मात्र, बॅलन्स तपासण्यापासून ते मिनी स्टेटमेंट किंवा पिन बदलण्यापर्यंत सर्व नॉन फायनान्शिअल ट्रान्सझॅक्शन मोफत राहतील.

आत्तापर्यंत किती शुल्क होते?
सध्या, पहिले 3 ट्रान्सझॅक्शन, ज्यात फायनान्शिअल आणि नॉन फायनान्शिअल ट्रान्सझॅक्शनचा समावेश आहे, 6 मेट्रो शहरांमध्ये (मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू आणि हैदराबाद) इतर बँकेच्या ATM मधून पैसे काढण्यासाठी पूर्णपणे मोफत आहेत आणि कोणतेही शुल्क आकारले जात नाही. ग्राहकांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

त्याचबरोबर मेट्रो नसलेल्या शहरांमध्ये 5 ATM ट्रान्सझॅक्शन मोफत करता येतील. यानंतर, मेट्रो शहरांमध्ये फायनान्शिअल ट्रान्सझॅक्शनसाठी प्रति ट्रान्सझॅक्शनसाठी 20 रुपये आणि नॉन फायनान्शिअल ट्रान्सझॅक्शन म्हणून 8.50 रुपये द्यावे लागतील.

1 जानेवारीपासून शुल्क आकारले जाणार आहे
1 जानेवारीपासून नवीन दर लागू झाल्यानंतर बँकेच्या ग्राहकांना 5 व्या ट्रान्सझॅक्शननंतर फायनान्शिअल ट्रान्सझॅक्शनसाठी प्रति ट्रान्सझॅक्शनसाठी 21 रुपये आणि नॉन फायनान्शिअल ट्रान्सझॅक्शनसाठी 8.50 रुपये द्यावे लागतील. खरं तर, या वर्षी जूनमध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकांना पैसे काढण्यासाठी किंवा ATM द्वारे निश्चित फ्री मंथली लिमिटपेक्षा जास्त ट्रान्सझॅक्शनसाठी जास्त शुल्क आकारण्याची परवानगी दिली.

10 जून रोजी जारी करण्यात आलेल्या RBI च्या सर्कुलरनुसार, बँकांना इतर बँकांच्या ATM मध्ये कार्ड वापरण्यासाठी (इंटरचेंज फी) भरपाई द्यावी आणि इतर खर्चात झालेली वाढ लक्षात घेता, प्रति ट्रान्सझॅक्शन चार्ज वाढवण्याची परवानगी दिली.