व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिणसाठी 4 कोटी 70 लाखांचा निधी मंजूर

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिण मतदार संघातील गावाच्या विकासकामांसाठी 4 कोटी 70 लाख निधी मंजूर झाला आहे. या निधीच्या माध्यमातून गावातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण, गटर, सामाजिक सभागृह, संभामंडप, ग्रामपंचायतीच्या जागेत स्वच्छतागृह व स्वयंपाकगृह बांधणे अशी विविध विकासकामे केली जाणार आहेत.

मंजूर करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये सैदापूर – राधाकृष्णनगरमधील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरणासाठी १० लाख, रेठरे खुर्द – अंतर्गत रस्ता खडीकरण व काँक्रीटीकरणासाठी ७ लाख, मुठ्ठलवाडी (भूरभूशी) येथे अंतर्गत गटर बांधणे- ५ लाख, शिंदेवाडी – अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणासाठी ५ लाख, दुशेरे – विकासमळा रोड उत्तम तुकाराम पाटील यांच्या शेतापासून कोडोली हद्दीपर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरणासाठी १० लाख, गोळेश्वर – गोळेश्वर फाटा ते जि. प. शाळा ते मारुती मंदिरपर्यंत मुख्यरस्ता रुंदीकरण व खडीकरण, बी. बी. एम. व कारपेट करणासाठी १० लाख, कालेटेक – ग्रामपंचायत मालकीच्या जागेत सामाजिक सभागृह बांधणासाठी १५ लाख, ओंड – विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर सभामंडप बांधणासाठी १० लाख.

येरवळे – जुने गावठाण येरवळे येथे मागासवर्गीय वस्तीतील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण व गटर बांधणे. बदलसाठी १० लाख, वारुंजी – उत्तम बळवंत पाटील ते किसन यशवंत पाटील रस्ता काँक्रीटीकरणासाठी १० लाख, वारुंजी – राजेंद्र श्रीरंग पाटील ते उध्दव मधूकर पाटील यांचे शेड पर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणेसाठी ५ लाख, पाचपुतेवाडी (तुळसण) – येथे अंतर्गत आर. सी. सी. गटर करणेसाठी ५ लाख, सवादे – हनुमान सांस्कृतिक भवना शेजारील ग्रामपंचायत जागेत स्वछता गृह व स्वयंपाकगृह बांधणेसाठी १० लाख, आटके – मागासवर्गीय वस्ती अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकीसाठी ६ लाख, जखीणवाडी – किशोर नलवडे यांचे घरापासून बनपुरीकर विहिर ओढ्यापर्यंत आर.सी.सी. पाईप बंदिस्त गटर बांधणेसाठी ५ लाख, जखीणवाडी – विष्णुपुरम अपार्टमेंट ते बचपन स्कूल पर्यंत आर. सी. सी. गटरसाठी १० लाख.

सैदापूर – पानंद कार्नर ते हणमंत नाईक यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरणासाठी ५ लाख, मालखेड – सुनिल घाटे यांच्या घरापासून ते बाळासो कुलकर्णी यांच्या घरापर्यंत गटर १० लाख, बेलवडे बु. – वार्ड क्र. 3 व 4 मध्ये अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करणासाठी १० लाख, वार्ड क्र. 1 व 2 मध्ये अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण व आर. सी. सी. गटर करणासाठी ७ लाख, गोटे – पाटण रोड वजनकाटा ते सुरेश धुमाळ यांच्या घरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरणासाठी १० लाख, नांदगाव – नांदगाव शिरंबेरोड पासून पोपट पाटील‍ यांच्या घराकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण करणासाठी १० लाख.

चचेगाव – कृष्णराव पाटील यांच्या घरापासून ते शिराज पठाण यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे. – रु. १० लाख, मनव – येथील प्राथमिक शाळा ते बौध्द वस्तीपर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण – रु. १० लाख, कार्वे – येथील मातंगवस्तीमध्ये रस्ता काँक्रीटीकरण व बंदिस्त गटर – रु. १० लाख, शिंगणवाडी – येथील स्मशानभूमी सूधारणा व संरक्षणभिंत बांधणे. – रु. ७ लाख, सैदापूर – येथे अंतर्गत रस्ता कक्रीटीकरण व गटर बांधणे. – रु. १०. लाख, गोवारे – कृष्णा कॅनॉल-सैदापूर ते गोवारे गावाकडे जाणारा कॅनॉल रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. – रु. १० लाख, येवती – मेनरोड पासून कुंभार वस्तीकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण – रु. ७ लाख.

वहागाव – र्येथील किल्ला परिसर येथे आर. सी. सी. गटर बांधणे.- रु. ७ लाख, येथील लक्ष्मीमंदिर ते भैरवनाथ मंदिर रस्ता काँक्रीटीकरण व गटर – रु. ८ लाख, धोंडेवाडी – येथील अंतर्गत आर. सी. सी. गटर बांधणे. – रु. १० लाख, मुंढे – जि. प. शाळा ते चाँद शिकलगार यांचे घरापर्यंत जाणारा रस्त्यास बंदिस्त काँक्रीटीकरण व बंदिस्त गटर बांधणे. – रु. ७ लाख.

नांदलापूर – येथील गोपाळ वस्तीतील आर. सी. सी. बंदिस्त गटर बांधणे. – रु. ७ लाख, कालवडे – येथील बेघर वस्तीमध्ये आर. सी. सी गटर बांधणे. – रु. ७ लाख, ओंड – कोयना बँकेपासून मारुती मंदिरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण – रु. १० लाख, मुनावळे – येथील केदारेश्वर मंदिर ते विश्वजीत बॅकवेट हॉलपर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे.- रु. ५ लाख, गोळेश्वर – येथील गोळेश्वर फाटा जि. प. शाळा ते मारुती मंदिर मुख्य रस्ता रुंदीकरण व खडीकरण, बी. बी. एम. व कारपेट उर्वरित काम – रु. ५ लाख, भैरवनाथनगर (काले) – येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे. – रु. ७ लाख, विंग – चचेगांव-धोंडेवाडी रस्ता ते सुतारकी वस्ती पर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. रु. १५ लाख, झुंजारवाडी – येथील यमाई मंदिर येथील बंदिस्त गटर बांधणे. – रु. ३ लाख, येथील स्मशानभूमी अंतर्गत काँक्रीटीकरण करणे.- रु. ५ लाख, टाळगाव – येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे. – रु. ७ लाख, गोळेश्वर – सुयोगनगर कॉलनी व कॉलनी परिसर अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉक बसविणे. – रु. ७ लाख.

येळगाव – येथील येळोबा मंदिर ते साईबाबा मंदिरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण – रु. १० लाख, घारेवाडी – येथे जुने गावठाणातील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे. – रु. ५ लाख, जखीणवाडी – येथे किशोर नलवडे ते दत्तू संतू नलवडे यांच्या घरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणे.- रु. ५ लाख, घराळवाडी – अंतर्गत रस्ता काँकीटीकरण करणे.- रु. ७ लाख, हणमंतवाडी – अंतर्गत रस्ता काँकीटीकरण करणे.-रु. ७ लाख, वहागाव – लक्ष्मीमंदिर ते भैरवनाथ मंदिर रस्ता काँक्रीटीकरण व आर. सी. सी. गटर – रु. ५ लाख, रेठरे खुर्द – कुंभार पाणंद रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. रु. १० लाख, कालवडे – स्मशानभूमी नुतनीकरण व सुशोभिकरण करणे – रु. १० लाख, गोंदी – कॅनाल ते श्री. तानाजी पोपट पवार यांचे शेतापर्यंत रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे. – रु. १० लाख.

आणे – विकासनगर ते रस्त्याच्या ओढ्याकडेला संरक्षकभिंत – रु. १० लाख, बेलवडे बु. – मागासवर्गीय वस्तीमध्ये दयानंद सखाराम वाघमारे यांचे घरापासून ते महेंद्र दिनकर कांबळे यांचे घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे. – रु. १० लाख, गोटे – वलीशा देसाई यांचे घरापासून राजू आगा व आल्लाउद्दीन देसाई यांचे घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे. – रु. १० लाख, मुंडे – येथील मागासवर्गीय वस्तीमध्ये श्री. संतोष माने व श्री जालिंदर माने यांचे घरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण व गटर करणे. – रु. १० लाख.