हाॅस्पीटल व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कोरोना बाधितांवर १०० किलोमीटर प्रवास केल्यानंतर सहा तासांने अंत्यसंस्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

प्रशासन व हाॅस्पीटल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कोरोना बाधिताला मरणानंतरही अवहेलना सोसावी लागली. कोरोना बाधितांच्या मृत्यूनंतर त्यांचा अंत्यसंस्कार सोपस्कर व नियमावलीने व्हावे, या उद्देशाने शासनाने अटी घातल्या आहेत. मात्र केवळ नियमांचा बागुलबुवा करून जबाबदारी हटकल्याने सातारा जिल्ह्यातील एका बाधितांला चक्क १०० किमोमीटरचा प्रवास व सहा तास अंत्यसंस्कारासाठी वेटींग करावा लागला. कोल्हापूर येथे बाधितांचा मृत्यू झाला होता, तेथील हाॅस्पीटल व प्रशासनाचे हलगर्जी करणाऱ्या लोकांच्यावर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केलेली आहे. केवळ इच्छाशक्ती नसल्याने कोल्हापूहून सातारा जिल्ह्यात अंत्यसंस्कारासाठी मृतदेह आणावा लागला.

पाटण तालुक्यातील कुठरे येथील एका 62 वर्षीय पुरूषाचा कराड येथील वेणूताई उपजिल्हा रूग्णालयात कोव्हीड पाॅझिटीव्ह आले होते. त्यानंतर बाधिताला कराड तालुक्यातील कोणत्याच ठिकाणी बेड न मिळाला नाही. बेड न मिळाल्याने नातेवाईकांनी बाधिताला कोल्हापूर जिल्ह्यातील नेबापूर येथील संजिवनी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. सदरील हाॅस्पीटलमध्ये बाधितांवर दहा दिवस उपचार चालू होते. सोमवारी दुपारी बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

पन्हाळा तालुक्यातील नेबापूर येथील संजिवनी हाॅस्पीटलने बाधितांचा मृत्यू झाल्यानंतर कोल्हापू शहरातील पंचगंगा येथे अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांना सांगितले. तेव्हा नातेवाईकांच्याकडे बाधितांचा मृतदेह सोपवून हाॅस्पीटल प्रशासन निवांत राहिले. हाॅस्पीटलला कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. पंचगंगा येथे अंत्यसंस्कारासाठी नेल्यानंतर तेथील प्रशासनाच्या जबाबदार व्यक्तींनी बाधित सातारा जिल्ह्यातील असल्याने अंत्यसंस्कारासाठी नकार दिला. तेथून नातेवाईकांनी बाधितांचा मृतदेह कराड येथे अंत्यसंस्कारासाठी आणलेला होता. तेव्हा कराडच्या पालिका प्रशासनाचे अत्यंविधी  करण्यासाठी असणाऱ्या लोकांनीही अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. अंत्यविधीसाठी चक्क कराडचे मुख्याधिकारी यांनी सातारा जिल्ह्यातील बाधित असला, तरी त्यांचा मृत्यू कोल्हापूर जिल्ह्यात झाल्याने अंत्यसंस्कारला नकार दिला. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी जिल्हाधिकारी यांचा आदेश मिळेपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका घेतलेली होती.

कराडच्या मुख्याधिकांऱ्यांच्या भूमिकेमुळे अखेर नातेवाईकांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी मुख्याधिकाऱ्यांना आदेश दिले. त्यानंतर कुठरे (ता. पाटण) येथील कोरोना बाधितांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र बाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी हाॅस्पीटल आणि कोल्हापूर जिल्ह्यातील व कराडच्या प्रशासनाला गांभीर्य नसल्याने बाधितांच्या मृतदेहाची अवहेलना पहायला मिळाली.

कराड स्मशानभूमीत चार तास मृतदेह

संजिवनी हाॅस्पीटलमध्ये पेशंटवर उपचार चालू होते. कोल्हापूर येथे मृतदेह नेल्यास तेथे गावी जाण्यास सांगितले.  कोरोना बाधित असताना पाॅझिटीव्ह असताना गावात कसे नेणार होतो, म्हणून आम्ही कराड येथे मृतदेह आणला. मात्र येथेही मुख्याधिकारी यांनी कलेक्टर यांच्या परवानगी शिवाय अंत्यसंस्कार देणार नसल्याचे सांगितले. येथे चार तास मृतदेह ठेवला आहे, मात्र त्यावर कोणताही निर्णय झाला नव्हता. अशा पध्दतीने आमच्या पेशंटच्या मृतदेहाची अवहेलना ही दुर्देवी आहे, प्रशासनाने गांभीर्याने वागावे, अशी  मागणी नातेवाईकांनी केली.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment