मुकेश भाईंची कमाल! जगातील टॉप १० ब्रँडच्या यादीत रिलायन्स दुसऱ्या स्थानावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । जगातील टॉप १० ब्रँडच्या यादीत रिलायन्स मोठी झेप घेतली आहे. फ्युचर ब्रॅन्ड इंडेक्स २०२० मध्ये रिलायन्सनं दुसरं स्थान पटकावलं आहे. तर अ‍ॅपल हा जगातील पहिल्या क्रमांकाचा ब्रॅड ठरला आहे.रिलायन्स इंडस्ट्रीज रिफायनरी, रिटेल आणि टेलिकॉम क्षेत्रातील प्रमुख कंपनी आहे. याशिवाय प्रत्येक ठिकाणी रिलायन्सनं आपल्याला सिद्ध केलं असल्याचं फ्युचर ब्रॅन्ड इंडेक्स २०२० ची यादी जाहीर करताना सांगण्यात आलं.

ऑईल क्षेत्रापासून ते टेलिकॉम क्षेत्रात सर्वच ठिकाणी रिलायन्स ही कंपनी भारतात सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. तसंच कंपनीबाबत सर्वांमध्ये चांगली भावना आहे आणि कंपनीदेखील नैतिकदृष्ट्या काम करते. नाविन्यपूर्ण उत्पादनं, उत्तम ग्राहक अनुभव आणि वृद्धी यासोबत कंपनी जोडली गेली असून कंपनीचे सर्वांसोबतच भावनिक संबंध आहेत, असंही यावेळी नमूद करण्यात आलं.

जगातील टॉप १० ब्रँड खलिलप्रमाणे
१)अ‍ॅपल

२)रिलायन्स

३)सॅमसंग

४)एनविडिया

5)मोताई

6)नायकी

७)मायक्रोसॉफ्ट

८)एएसएमएल

९)पेपाल

१०)नेटफ्लिक्स

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment