चंद्रपुरात भरदिवसा रस्त्यावर आला वाघ, दोन्ही बाजूंची वाहतुक खोळंबली

gabbar tiger
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपूर जिल्हा परिसरातील जंगलात वाघ पाहायला मिळतात. यातच आता एका वाघाचा (gabbar tiger) व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा साधा वाघ नसून प्रसिद्ध असलेला गब्बर वाघ (gabbar tiger) आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील आपल्या भारदस्त शरीरयष्टी साठी प्रसिद्ध असलेला गब्बर वाघ (gabbar tiger) हा वाहतूक होणाऱ्या रस्त्यावर पाहायला मिळाला.

काय आहे नेमका प्रकार ?
चंद्रपूर जिल्ह्यातील गब्बर वाघ (gabbar tiger) हा आपल्या भारदस्त शरीरयष्टी साठी प्रसिद्ध आहे. गब्बर वाघ हा नागभीड ब्रह्मपुरी रोड ओलांडताना शेघाट शिवारात नागरिकांना पाहायला मिळाला. गब्बर वाघाच्या डरकाळीमुळे त्याला रस्ता ओलांडायचे आहे हे नागरिकांना लक्षात आल्यानंतर दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली होती. तर गब्बर वाघाने (gabbar tiger) रस्ता ओलांडल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. यादरम्यान काही दुचाकीस्वारांनी आपला जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. रस्ता ओलांडणाऱ्या गब्बर वाघाचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

याच वाघामुळे (gabbar tiger) काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. ही घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्यात घडली होती. वाघाने केलेल्या हल्ल्यात एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. राजेंद्र अर्जुन कमादी असे त्या मृत व्यक्तीचे नाव होते. मृत व्यक्ती ब्रह्मपुरी तालुक्याच्या हल्दी गावातील रहिवासी होता. तसेच तो मजुरी काम करत होता.

हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान

आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाला दुसरा धक्का, ‘या’ चुकीमुळे पाकिस्तानला झाला फायदा

खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे

नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार