दुकानदारास बनावट मेसेज दाखवून फसवणूक करणारा गजाआड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
सातारा शहरातील शालगर इलेक्ट्रॉनिक शॉपींग सेंटर या दुकानदारास पैसै पाठविल्याचा बनावट मेसेज दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. दुकानातून फ्रिज, साउन्ड सिस्टीम असा एकूण 41 हजार 500 रुपये किंमतीच्या वस्तू घेवून फसवणूक केली आहे. त्याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होता.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील शालगर दुकानात घेतलेल्या वस्तूचे पैसे ऑनलाईन पाठविले असलेचा बनावट मेसेज दुकानदारास दाखविला. त्यानंतर दुकानदाराची फसवणूक करून सदरचा माल घेवून गेला होता. सदर गुन्ह्याचे अनुशंगाने सातारा शहर पोलीसांनी तांत्रिक माहिती घेतली असता, सदरचा इसम हा सराईत असल्याचे समजून आले. त्याने यापुर्वी देखील मोटारसायकल, मोबाईल याची अशाच प्रकारे फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे.

पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक बापू बांगर, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलीस निरीक्षक श्रीमती वंदना श्रीसुंदर हे तपास करीत असताना सदरचा इसम हा बारामती शहरामध्ये असलेबाबत माहिती प्राप्त झाली. त्यानंतर सदर इसमास पकडेकामी डी. बी. पथक बारामती शहरामध्ये गेले होते. बारामती शहरामध्ये सदर इसमाचा विविध ठिकाणी शोध घेवून त्यास ताब्यात घेतले. त्याचेकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगितले. सदर गुन्हयातील फ्रिज व साऊंड सिस्टिम पोलीसांनी जप्त केलेला आहे. सदर इसमाने अशाच प्रकारे कोठे फसवणूक केली आहे का याबाबत पोलीस अधिक तपास करित आहेत. सदरची कारवाई गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पो. ना. सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, संजय खाडे, पंकज ठाणे, अभय साबळे, विक्रम माने, संतोष कचरे, गणेश भोंग, सागर गायकवाड, गणेश घाडगे, विशाल धुमाळ यांनी केलेली आहे.