सुषमा अंधारे राष्ट्रवादीचं पार्सल, राजकारणातील फिरता चषक; गजानन काळेंची टीका

0
145
Gajanan Kale Sushma Andhare
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सुषमा अंधारे यांच्याबद्दल नवीन शब्द वापरत आहे तो म्हणजे स्टूलवाली बाई होय. कधीकाळी मुंबईत मोर्चे निघायचे तेव्हा अहिल्याताई रांगडेकर, मृणालताई यांना खास पाणीवाली बाई म्हंटल जायचं. त्या महागाई व पाण्याच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरल्या. मात्र, कुठलंही कर्तृत्व नसताना, कुठल्याही प्रश्नाला कधीही हात घातलेला नसताना आणि कोणताही प्रश्न सुषमा  अंधारेंनी सोडवलेला नाही. हे पोकळीतून आलेलं नेतृत्व आहे. या कधी राष्ट्रवादीच्या तर कधी काँग्रेसच्या आता शिवसेनेच्या व्यासपीठावर आहेत. अंधारे या राष्ट्रवादीचं पार्सल आहेत त्या राजकारणातील फिरत चषक आहे, अशी टीका मनसेचे विद्यार्थी सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी केली.

कराड येथे आज मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात मनसेचे विद्यार्थी सेनेचे प्रवक्ते गजानन काळे सहभागी झाले आहेत. काळे यांनी कराड येथे आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे या स्टूलवाली बाई आहेत. वास्तविक त्या सुषमा अंधारे हा राजकारणातील फिरता चषक आहेत. वर्षभरात यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत, तर त्या दुसरीकडे कुठेतरी दिसतील.

सुषमाताई अंधारे यांना नवीन धुमाळे लागले आहेत ते म्हणजे मी महाराष्ट्राची पहिली मुख्यमंत्री होणार म्हणून पण त्यांना अजून उद्धव ठाकरे यांच्या स्टाईलची कल्पना नाही. उद्धव ठाकरे यांनी अशीच गाजरे शिवसैनिकांना दिली कि मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार असे म्हणाले आणि स्वतःचा तुमकां मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत जाऊन बसले.

संजय राऊत आणि शिवसेना निम्मा पक्ष संपवला आता सुषमा अंधारे राहिलेला पक्ष संपवणार आहे. उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून सुषमा अंधारे यांच्या सभा नको, त्यांना आवरा असे सांगितले जात आहे. वास्तविक मुंबईची तुंबई करण्यास शिवसेना व भाजप जबाबदार आहे, अशी टीका काळे यांनी केली आहे.