सातारा | सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांनी तीन ठिकाणी जुगार अड्ड्यावर धाडी टाकलेल्या आहेत. या धाडीत 14 जणांवर संशयितांवर कारवाई केलेली असून 20 हजार रूपयांच्या रक्कमेसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूपुरी पोलिसांनी राजधानी टॉवर्समध्ये जुगार खेळणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. सागर जयसिंग भोसले (रा.केसरकर पेठ), नरेंद्र जांभळे (रा.शाहूपुरी), यास्मिन शेख (रा. गुरुवार परज) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी या कारवाईत रोख 1 हजार 222 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. दुसरी कारवाई गुजर आळी येथे करण्यात आली आहे. यामध्ये विक्रम बाळकृष्ण दुबळे (रा. मंगळवार पेठ), यासिन शेख (रा. गुरुवार परज) अशी संशयितांची नावे असून 7 हजार 972 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तिसरी कारवाई शहर पोलिसांनी पालवी हॉटेलच्या पाठीमागे गोडोली येथे केली. याप्रकरणी जोतीराम कृष्णा कारंडे, सचिन कृष्णा देशमुख (दोघे रा. सिद्धेश्वर कुरोली ता. खटाव), वसीम इब्राहिम शेख (रा. शनिवार पेठ), मधुकर काकासाहेब माने (रा. लिंबाचीवाडी ता. सातारा), अतुल बबन पार्टे (रा. आष्टे पो. नागठाणे ता. सातारा), सचिन शिंदे (रा. शनिवार पेठ), भावेश संपत कुचेकर (रा. सुरुर ता. वाई), कटाप्पा साईनाथ इंगळे (रा.चंदननगर, कोडोली), समीर सलीम कच्छी (रा. मोळाचा ओढा) या 9 संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी या कारवाईत संशयित आरोपींकडून 10 हजार 348 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.