नवाब मलिक यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे; प्रवीण दरेकर यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अभिनेता शाहरुख खान यांच्या मुलगा आर्यन खान याच्या ड्रग प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ड्रग्ज प्रकाराशी संबंधित व्यक्तींचा शोध घेत त्याची माहिती दिली जात आहे. दरम्यान त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर ड्रग्ज प्रकरणी गंभीर आरोप केला आहे. यावरून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मलिक यांच्यावर टीका केली आहे. नवाब मलिक यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं दिसतंय,” असे दरेकर यांनी म्हंटले आहे.

प्रवीण दरेकर यांनी आज ट्विट करीत मलिक यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “नवाब मलिक यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं दिसतंय. रोज सकाळी उठल्यावर कुठलातरी फोटो शोधायचा आणि त्या आधारे ट्विट करून सनसनाटी निर्माण करायची अशाप्रकारची त्यांची कामगिरी गेल्या काही दिवसांपासून दिसतेय.”

नवाब मलिक हे काहीही बोल्ट आहेत. त्यांच्याकडून काहीही आरोप केले जात आहेत. त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेले आहे. त्यांचा राजीनामाच घेण्यात यावा, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.

You might also like