जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा प्रताप, झेडपीच्या आवारातच बनवला जुगाराचा अड्डा

0
78
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – यवतमाळमध्ये जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा प्रताप उघडकीस आला आहे. यवतमाळ जिल्हा परिषेदेच्या आवारात जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती अवधुतवाडी पोलिसांना मिळली त्यानंतर त्यांनी या माहितीची खातरजमा करुन त्या ठिकाणी धाड टाकली. यावेळी जिल्हा परिषेदेचे 8 कर्मचारी जुगार खेळतांना आढळून आल्याने त्यांच्या वर कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईमधून जुगाऱ्याकडून पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच यामध्ये काही मोठे जुगारी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. प्रकाश वामन कुद्र पवार, देवनांद विठ्ठल जामनकर, गणेश गोस्वावी, प्रकाश व्यास, गुणवंत ढाकणे, अनिल शिरभाते, संदीप श्रीराम , चरण तारासिंग राठोड अशी अटक करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय असून या ठिकाणी ग्रामीण भागातील नागरिक आपली अनेक कामे घेऊन येत असतात. मात्र त्या लोकांना हे कर्मचारी थातुरमातुर उत्तर देऊन आल्या पावली परत पाठवून कर्मचारी, अधिकारी आपल्या वैयक्तिक कामात व्यस्त होऊन जातात. ज्या ठिकाणी लोकांची कामे होतात त्याच ठिकाणी कर्मचाऱ्यांनी जुगाराचा अड्डा बनवला आहे. यामुळे आता मुख्याधिकारी नेमकी काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here