नंदुरबार मध्ये गांधीधाम एक्स्प्रेसला भीषण आग; प्रवाशांमध्ये घबराट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नंदुरबार रेल्वे स्थानकावर गांधीधाम एक्स्प्रेसला मोठी भीषण आग लागली आहे. रेल्वे स्टेशनच्या आत येण्याआधीच गाडीला अचानक आग लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, घटनास्थळी अग्निशामक दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत.

पॅन्ट्री कार आणि एका एसी बोगीला ही आग लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, नंदुरबार स्थानकावर रेल्वे प्रशासनाकडे आग विझवण्यासाठी पुरेशी यंत्रणा सज्ज नसल्याने, आगीने रौद्र रुप धारण केले. सध्या नंदुरबार स्थानिक प्रशासनाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, भीषण आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची एकच धावपळ उडाली. काही प्रवाशांनी तर घाबरून आरडाओरड सुरू केली. किंचाळ्या आणि गोंगाटामुळे एक्सप्रेसमध्ये एकच गोंधळ उडाला. भडकत जाणारी आग आणि त्यामुळे पसरलेल्या धुराच्या लोट पसरल्याने काही प्रवाशांना तर श्वास घेण्यासही त्रास झाला

Leave a Comment