अनिल देशमुख पोलिसांच्या बदल्यांसाठी ….; सीताराम कुंटेंचा धक्कादायक खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटींच्या कथिक वसुली प्रकरणी अडचणीत सापडलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काही धक्कादायक खुलासे ‘ईडी’समोर केले आहेत, ज्यामध्ये त्यांनी म्हंटल आहे की अनिल देशमुख हे पोलिसांच्या बदल्यांसाठी त्यांना अनधिकृत याद्या पाठवायचे. कुंटे यांच्या या गौप्यस्फोटा नंतर देशमुखांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.

सीताराम कुंटे यांनी अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना मला पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे, अशी कबुली ‘ईडी’समोर दिली आहे. यामध्ये संबंधित पोलीस अधिकाऱ्याची कुठल्या जागी आणि कोणत्या पदावर बदली करायची, हे नमूद केलेले असायचे. अनिल देशमुख यांचा स्वीय सहायक संजीव पालांडे यांच्यामार्फत या अनधिकृत याद्या माझ्यापर्यंत पोहोचवल्या जात असत असे त्यांनी म्हंटल.

ते पुढे म्हणाले, मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अंडर काम करत असल्याने संबंधित याद्या स्वीकारण्यास नकार देऊ शकत नव्हतो. त्यामुळे पोलीसांच्या बदल्या करताना या नावांचा समावेश केला जायचा, असे सीताराम कुंटे यांनी ‘ईडी’च्या चौकशीदरम्यान सांगितल्याचे समजते. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.