नवी मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांचे पुत्र आमदार संदीप नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याच प्रमाणे काही दिवसातच गणेश नैखे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशातच गणेश नाईक यांचे दुसरे पुत्र माजी खासदार संजीव नाईक हे राष्ट्र्वादीतच राहणार असल्याच्या चर्चांना आता ऊत आला आहे.
ताईशी संवाद या कार्यक्रमाच्या निमित्त सुप्रिया सुळे या नवी मुंबईत आल्या असता त्यांच्या गाडीत संजीव नाईक यांच्या पत्नी होत्या. त्याच प्रमाणे ज्यावेळी कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी सुप्रिया सुळे आणि संजीव नाईक यांच्यात गुप्त बैठक देखील पार पडली आहे. त्यामुळे संजीव नाईक ही भाजप प्रवेशासाठी उत्सुक नाहीत असेच चित्र असल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान जेष्ठ नेते गणेश नाईक हे काही दिवसातच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जाते आहे. त्याच्या सोबत नवी मुंबई महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक देखील मोठ्या संख्येने भाजपमध्ये सामील होणार आहेत. मात्र अशा सर्व स्थितीत राष्ट्रवादीने संजीव नाईक यांना आपल्या जवळ ठेवण्याचा कुटील डाव आखून भाजपमध्ये चाललेल्या गणेश नाईक यांच्या पायात पायगुत्ता करण्याचा प्रयत्न केला आहे.