सकलेन मुलाणी । कराड
कपिल (ता.कराड) येथील सरपंच तसेच गटविकास अधिकारी यांच्यात आर्थिक तडजोड झाल्यानेच कापिल गावच्या 24 तास पाणी योजनेची चौकशी केली जात नाही. त्यामुळे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांची चौकशी करून त्यांचे निलंबन करण्यात यावी अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश पवार यांनी केली आहे.
गणेश पवार म्हणाले, गेल्या आठ दिवसापासून मी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेलो आहे. कापिल येथे झालेल्या चोवीस बाय सात पाणी योजना तसेच सरपंच यांनी पदाचा गैरवापर करून विकास कामात भ्रष्टाचार केला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मी मागणी केली आहे. परंतु गटविकास अधिकारी यांनी कोणतीही चौकशी न करता केवळ म्हणणे घेऊन, या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले आहे. गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी आणि सरपंच यांच्यात आर्थिक तडजोड झाल्यानेच या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे गटविकास अधिकारी यांची चौकशी करून त्यांचे निलंबन करण्यात यावे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’