औरंगाबाद | वैजापूर पासून चार किलोमीटर अंतरावर औरंगाबाद रोटेगाव पुलाजवळ चंदनाचे झाड तोडून सुगंधी लाकडाची तस्करी करणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. ही कारवाई बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास करण्यात आली.
ज्यावेळी पोलिसांनी सात किलो सुगंधित चंदनाच्या लाकडाचे तुकडे, दोन दुचाकी, एक धारदार कुऱ्हाड, मोबाईल, रोख रक्कम असा 75 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. शेख साबेर शेख हुसेन (50), सादिक युसुफ पठाण (28), शेख जाकीर शेख भिकू (24), विशाल यशवंत खरात (29) अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व सिल्लोड तालुक्यातील घटांब्री येथील रहिवासी आहेत.
वैजापूर शिरूर रस्त्यावरून सिल्लोड तालुक्यातील शेख साबेर चंदनाची तस्करी करणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने पहाटे रोटेगाव पुलाजवळ दबा धरून शिरूरकडे जाणाऱ्या लाल रंगाची (दुचाकी एम एच 20 – बीपी 2859) व त्यांच्यामागून आलेल्या दुसऱ्या दुचाकीला ही (एमएच 19 बीए 3323) ते वीस थांबवले. या चौघांकडे असलेल्या पोत्याची पाहणी केली असता, त्यात चंदनाचे सुगंधित लाकडाचे तुकडे आढळून आले. शहराच्या पाठीमागे असलेल्या नाल्याच्या बाजूची तीन चंदनाची झाडे तोडून त्यातील सुगंधी गावात चोरल्याची कबुली चोरांनी दिली. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात चोरी व वन अधिनियम कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.