धक्कादायक ! SUV कार दिली नाही म्हणून कुटुंबातील 12 जणांकडून विवाहितेवर बलात्कार

rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरोहा : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 24 वर्षी तरुणीने हुंडा दिला नाही म्हणून कुटुंबातील 12 जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला असा आरोप तिने केला आहे. यासंदर्भात महिलेने पोलीस ठाण्यात तक्रारसुद्धा दाखल केली आहे. सामूहिक बलात्कारासोबत क्रौर्य, अनैसर्गिक गुन्हा आणि महिलेला गर्भपात करण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोपसुद्धा या महिलेने केला आहे.

या महिलेने केलेल्या तक्रारीवरून विविध कलमांअंतर्गत महिलेच्या सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कथित स्वरुपात बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीने सांगितलं की, तिच्या पतीच्या कुुटुंबातील सदस्य आणि त्यांच्या मित्रांनी सांगितलं की, जर पतीला हुंड्यात एक SUV कार आणि 5 लाख रुपये नाही दिले तर हे सुरूच राहिल.

महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, 3 वर्षांपूर्वी माझं लग्न झालं होतं. माझ्या आई-वडिलांनी आधीच हुंड्याच्या रुपात बरच काही दिलं होतं. काही महिन्यांनंतर माझे पती आणि त्यांच्या कुटुंबाने 5 लाख रुपयांची कॅश आणि एक लग्जरी कारची मागणी केली. मात्र मी याचा विरोध केला. त्यानंतर त्यांनी मला त्रास द्यायला सुरू केले. यानंतर मी जेव्हा गर्भवती झाली तेव्हा त्यांनी मला गर्भपात करायला जबरदस्ती केली. त्यांनी मला मारहाण सुरू केली. शेवटी मी माहेरी निघून गेली. यानंतर सासरच्या मंडळींनी माझे मन बदलवून पुन्हा सासरी नेले. यानंतर कुटुंबातील व त्यांचे मित्र अशा 12 जणांनी माझ्यावर सामूहिक बलात्कार केल्याचं या महिलेने आपल्या तक्रारीत सांगितले आहे.