हायवे वर लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – हायवेवर वाहने अडवून लुठणाऱ्या तीन दरोडेखोरांना औरंगाबादच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडले. त्यांच्याकडून 13 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रवींद्र जाधव, राहुल चव्हाण आणि सचिन ऊर्फ बाबा चव्हाण अशी या आरोपींची नावे आहे. ही एकूण पाच दरोडेखोरांची टोळी होती. यापैकी तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून यातील दोघे मात्र फरार आहेत.

नवीन बीड बायपास रोडवरील देवळाई उड्डाणपुलाखाली 13 नोव्हेंबर रोजी रात्री पांडुरंग गायकवाड हे ट्रकमधून ट्रान्सपोर्टचा माल घेऊन जात होते. तेव्हा दरोडेखोरांनी त्यांना अडवून मारहाण केली. तसेच पैसे आणि मालासह ट्रक पळवून नेला. संभाजी साखर कारखाना, चितेगावजवळ ट्रक सोडून दरोडेखोर पसार झाले. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास सुरु असताना पोलीस हवालदार बाबासाहेब नवले यांना राहुल जयसिंग चव्हाण, रवींद्र मानसिंग जाधव, सचिन ऊर्फ बाबा अंबादास चव्हाण व इतर दोन साथीदार अशा पाच जणांनी हा ट्रक लुटल्याचे कळले.

स्थानिक गुन्हे शाखेने विविध पथके तयार करत रवींद्र जाधव यालाही पकडले. त्याने चौकशीनंतर गुन्ह्याची कबुली दिली. तसेच राहुल चव्हाण आणि सचिन ऊर्फ बाबा चव्हाणदेखील सापडले. त्यांच्याकडून 8 लाख 88 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी अटक केलेल्या तिघांकडून 8 लाख 88 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात पाण्याच्या मोटार, कपडे, भांडी, केबल वायर आणि शेतीउपयोगी साहित्य पोलिसांनी जप्त केले. तसेच गुन्ह्यात वापरलेली पाच लाखांची चारचाकी जप्त करण्यात आली.

Leave a Comment