Wednesday, October 5, 2022

Buy now

Aryan Khan Extortion Case : पूजा ददलानीच्या स्टेटमेंटची नोंद न केल्याने थांबला ‘वसुलीचा’ तपास, आता बजवणार तिसरे समन्स

मुंबई । क्रुझ ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या अधिकाऱ्यांनी केलेल्या खंडणीच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या स्पेशल इन्वेस्टिगेटिव टीम (SIT) ने बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिला अटक केली आहे. तिला दुसरे समन्स पाठवण्यात आले आहे. पूजा ददलानी अद्याप SIT समोर हजर झालेली नाही. ददलानीने प्रकृतीच्या समस्येचे कारण देत आणखी काही दिवसांची मुदत मागितली आहे. पूजा ददलानीच्या स्टेटमेंटची नोंद न केल्यामुळे तपासात अडथळे येत असल्याचे SIT ने म्हटले आहे. मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावेळीही पूजा ददलानी तिचे म्हणणे नोंदवण्यासाठी पोहोचली नाही तर तिला तिसरे समन्स बजावण्यात येईल. पोलीस अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात ददलानीचे स्टेटमेंट अत्यंत महत्त्वाचे बनले आहे.

मुंबई पोलीस केपी गोसावी, सॅम डिसोझा आणि NCB च्या अधिका-यांकडे प्रभाकर साईलकडून झालेल्या खंडणीच्या आरोपांची चौकशी करत आहेत. ददलानीला पैसे देण्यास सांगण्यात आल्याचे बोलले जात आहे. आता ददलानी तिचे स्टेटमेंट नोंदवायला पुढे येत नसल्यामुळे मुंबई पोलीस तपास पुढे कसा चालवायचा याबाबत कायदेशीर मतही घेत आहेत. या संपूर्ण प्रकरणात सॅम डिसूझाने SIT समोर आपले स्टेटमेंट नोंदवले आहे.

याआधी डिसोझाने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन याचिकेत दावा केला होता की, आर्यन खानची सुटका करण्यासाठी गोसावीने शाहरुख खानची व्यवस्थापक पूजा ददलानी यांच्याकडून 50 लाख रुपये घेतले होते. या प्रकरणी NCB ने आर्यन खानला 3 ऑक्टोबर रोजी अटक केल्यानंतर ही रक्कम परत करण्यात आल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. आर्यन खानकडून कोणतेही अमली पदार्थ सापडले नसून तो निर्दोष असल्याचे गोसावी यांनी आपल्याला सांगितले होते, असा दावाही डिसोझा यांनी केला.

आर्यन खानला NCB ने 2 ऑक्टोबरला केली होती अटक
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (23) आणि इतर काही जणांना NCB ने 2 ऑक्टोबर रोजी मुंबई किनार्‍यावर गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझ जहाजावर छापा टाकून अटक केली होती. क्रूझकडून अमली पदार्थ जप्त केल्याचा दावा एजन्सीने केला आहे. आर्यनला 3 ऑक्टोबर रोजी NDPS कायद्यांतर्गत अंमली पदार्थ बाळगणे, वापरणे आणि तस्करी करणे या प्रकरणी अटक करण्यात आली होती.