सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यातील वाई शहरातील उचभ्रू काॅलनी मध्ये एका बंगल्यातच गांज्याची मोठ्या प्रमाणात शेती केली जात असल्याच समोर आले आहे. महत्वाच म्हणजे ही अमली पदार्थाची शेती ही या बंगल्याच्या आत मध्येच केली जात होती. या घटनेने सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
दोन परदेशी व्यक्तीच ही गांज्याची शेती गेल्या एक वर्षा पासून करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे दोन परदेशी व्यक्ती गेल्या वर्षभरापासून या बंगलो मध्ये व्हिसा नसताना देखील राहत होते. मात्र या बाबत कोणालाही कल्पना नव्हती. काही पोलीस चौकशीसाठी आल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे.
सध्या या गांजाच्या शेतीची मोजदात केली जात असून नेमका किती रुपयांचा माल असेल या बाबत पोलीस माहिती घेतायत. अपर पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.