कोल्हापूर प्रतिनिधी। राजर्षी शाहू नाक्याजवळ गस्त घालत असताना गांजा विक्री करणाऱ्या दोघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली असून त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. सुनीता किरण अवघडे आणि अमर सदाशिव पाटील अशी संशयितांची नावे आहेत. सायंकाळी सव्वासात वाजता ही कारवाई करण्यात आली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजारामपुरी पोलिसांकडून गस्त घातली जात आहे. सोमवारी सायंकाळी मोटारसायकलवरुन जाणाऱ्या दोघांची तपासणी केली असता पिवळ्या रंगाच्या कॉटन कापडाच्या पिशवीत अर्धा किलो गांजा सापडला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता शहरात विक्रीसाठी गांजा नेत असल्याची कबुली त्यांनी दिली.
विधानसभा निवडणूक सुरु असल्यामुळं सध्या आदर्श आचारसंहिता सुरु आहे. या काळात कोणत्याही अवैध वस्तू बाळगण्यास मनाई आहे. तरीही अशाप्रकारचे गुन्हे उघडकीस येत आहेत. त्यामुळं या गुन्हेगारांच करावं काय असा पोलिसांना प्रश्न पोलिसांना पडला आहे.
इतर काही बातम्या-
अबब..!! प्रदीप शर्मांच्या पत्नीची मालमत्ता तब्बल २४ कोटी
वाचा सविस्तर – https://t.co/sc9vGPDzIw@ShivsenaComms @ShivSena @OfficeofUT @Dev_Fadnavis @DGPMaharashtra #Vidhansabha2019 #MaharashtraElections2019
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 10, 2019
*राहुल गांधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुक प्रचारात घेणार उडी*
*वाचा सविस्तर* – https://t.co/FtpeHTem3a@INCSandesh @IYCMaha @INCMumbai @INCIndia @AshokChavanINC @prithvrj @bb_thorat #Vidhansabha2019 #MaharashtraElections2019
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 10, 2019
वंचित उमेदवाराचा एसटीत ‘चालता बोलता’ प्रचार
वाचा सविस्तर – https://t.co/M9G41zP9ET@Prksh_Ambedkar #vanchitaghadi#prakashambedkar#MaharashtraElections2019 #Vidhansabha2019
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 10, 2019