हाय BP वर लसूण ठरेल रामबाण उपाय; होतात भरपूर फायदे

garlic High BP
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खराब दिनचर्या, अयोग्य आहार आणि ताणतणाव यामुळे उच्च रक्तदाबासह अनेक आजार आजकाल एक सामान्य समस्या बनली आहे. या स्थितीत धमनीमध्ये रक्ताभिसरण वेगाने सुरू होते. उच्च रक्तदाबामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. या आजारात व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो, डोकेदुखी आणि छातीत दुखते आणि मळमळ होते. याकडे आपण दुर्लक्ष्य केल्यास स्ट्रोक देखील होऊ शकतो. उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, योग्य आहार घेणं गरजेचं आहे. पण तुम्हाला माहित आहे का? रोजच्या घरगुती वापरातील लसूणही उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतो.

तज्ज्ञांच्या मते, लसणाचे सेवन उच्च रक्तदाबावर फायदेशीर ठरते. लसणात आढळणाऱ्या अॅलिसिन मुळे रक्तदाबावर सकारात्मक परिणाम होतो. उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी लसणाचा वापर सॅलडमध्ये करता येतो. त्याचबरोबर सूपमध्ये लसूण टाकून सेवन करता येते. निरोगी राहण्यासाठी डॉक्टर नेहमी रिकाम्या पोटी लसूण खाण्याचा सल्ला देतात.

सध्या थंडीचे दिवस असून आजारापासून दूर जाण्यासाठी आपल्या शरीरात रोगप्रतिकार शक्ती असं गरजेचं आहे. लसणात असलेले अँटीऑक्सिडेंट शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करतं. यामुळे हृदय निरोगी राहते आणि ह्रदयासंबंधित आजार कमी होतात.

लसूण मधासोबत खाल्ल्याने उच्च रक्तदाबात लवकर आराम मिळतो. त्याचबरोबर लसणाच्या सेवनाने सर्दी-खोकला, सर्दी आणि दमा यांमध्येही आराम मिळतो.

लसणाची चव कडू लागते. त्यामुळे बहुतेक लोक कच्चा लसूण खाऊ शकत नाहीत. त्यामुळे ते लोक लसूण भाज्या आणि कडधान्यांमध्ये मिसळून खाऊ शकतात. त्यामुळेही रक्तदाब नियंत्रणात राहील.