Sunday, January 29, 2023

धक्कादायक ! जिवलग मित्रानेच काढला मित्राचा काटा, काय आहे नेमके प्रकरण?

- Advertisement -

डोंबिवली : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सध्या गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. यामध्ये किरकोळ कारणावरून लोक एकमेकांच्या जीवावर उठत आहेत. सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली शहरात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका सिगारेटमुळे आरोपीने आपल्या मित्राचा जीव (Murder) घेतला आहे. याप्रकरणी रामनगर पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे.

जयेश देवजी जाधव असे हत्या करण्यात आलेल्या मृत (Murder) तरुणाचे नाव आहे तर हरिश्चंद्र उर्फ बकुळ रामदास चौधरी असे हत्या करणाऱ्या आरोपी मित्राचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी हरिश्चंद्र उर्फ बकुळ याला चोळेगाव ठाकुर्ली येथून अटक केली आहे.

- Advertisement -

काय आहे नेमके प्रकरण?
मृत जयेश आणि आरोपी हरिश्चंद्र उर्फ बकुळ हे दोघेही मित्र आहेत. दोघांनाही दारूचे व्यसन होते. त्यानंतर आरोपीने जयेशला सिगारेट आणायला सांगितली. यावरून दोघांचा वाद झाला. यानंतर रागाच्या भरात बकुळने जयेशला मारायला सुरुवात केली. यादम्यान त्याचे डोके भिंतीवर आणि जमिनीवर आपटले. या मारहाणीत जयेशचा मृत्यू (Murder) झाला. आरोपीला सध्या अटक केली असून लवकरच त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती