हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली आहे. विशेष बाब म्हणजे, आता गौतम अदानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सोळाव्या स्थानावर पोहोचले आहेत. यापूर्वी ते श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 20 व्या स्थानावर होते. गेल्या काही दिवसांमध्ये अदानी समूहाच्या शेअर्समध्ये झालेली वाढ गौतम अदानी यांना चांगलीच फायदेशीर ठरली आहे.
गौतम अदानी यांना 6 व्यापारी सत्रात 50,000 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. तसेच, शेअर बाजारामध्ये अनेक कंपन्यांच्या समभागांच्या वाढीनंतर निव्वळ संपत्तीत सुमारे 3,677 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ज्यामुळे गौतम अदानी यांची संपत्ती 70.2 अब्ज डॉलरवर पोहचली आहे. यामुळेच ते जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 20 व्या स्थानावरून 16 व्या स्थानावर आले आहेत.
दरम्यान, अदानी हिंडेनबर्ग घडल्याच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने अदानी समूहाबाबत अनुकूल टिपणी केल्यापासून त्यांच्यावरील गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा वाढत चाललेला दिसून येत आहे. त्याचबरोबर आता शेअर्समध्ये होत चाललेली वाढ देखील गौतम अदानींना सर्वात श्रीमंत बनण्यास कारणीभूत ठरली आहे. यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचा सकारात्मक परिणामही अदानी समूहाच्या शेअर्सवर पडला आहे.
एलॉन मस्क नंबर 1
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये एलॉन मास्क नंबर वन स्थानावर आहेत तर दुसऱ्या स्थानावर ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आहेत. तिसऱ्या तर बर्नार्ड अर्नाल्ट आहेत. चौथ्या स्थानावर मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आहेत. पाचव्या स्थानावर लॅरी एलिसन आहेत. तसेच सहाव्या स्थानावर स्टीव्ह बाल्मर स्थानावर आहे.