नवी दिल्ली | क्रिकेटमधील भारताचा सलामीचा फलंदाज गौतम गंभीर याने आंध्र प्रदेशविरुद्धचा आपला शेवटचा सामना आज खेळला. शेवटच्या सामन्यात शतक झळकवून गंभीरने क्रिकेटला दणक्यात निरोप दिला. त्याने या सामन्यात 185 चेंडूंमध्ये 112 धावां काढल्या, यात १० चौकार मारले.
उल्लेखनीय म्हणजे क्रिकेटच्या अनेक मोठमोठया खेळाडूंनाही हे जमले नाही. शेवटला सामना खेळतांना भावना उचम्बळून येत असल्याने असे होत असेल. गंभीरने 4 डिसेंबरला निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता. त्यावेळी आंध्र प्रदेशविरुद्ध आपला हा अखेरचा सामना असेल, असे त्याने सांगितले होते.
या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. आंध्र प्रदेशने पहिल्या डावात 390 धावा केल्या. यानंतर गंभीर जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरला तेव्हा त्याला गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
इतर महत्वाचे –
हेल्मेट घेताय? या ५ गोष्टींचा विचार करा
भारतीय नौदलाच्या या कामगिरीमुळे ७ दिवस जळत होता कराची नौदल बेस