GDP : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘माती कला महोत्सवा’ला संबोधित करताना अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. यावेळी त्यांनी खादी क्षेत्राच्या व्यवसायात तिप्पट वाढ म्हणजे मोठ्या संख्येने लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगीतले आहे. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचे सांगितले आहे.
तसेच यावेळी गृहमंत्री अमित शाह म्हणाले की अशा उपक्रमांमुळे सकल देशांतर्गत उत्पादनाचे (जीडीपी) वाढणारे आकडे अधिक मानवी होतील. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांमुळे स्वातंत्र्य चळवळीपेक्षा खादी लोकांसाठी अधिक आकर्षक बनली आहे. तसेच “भारताच्या जीडीपी डेटाने सूचित केले आहे की आम्ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहोत. मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने विकसित झाली आहे. पूर्वी आपली अर्थव्यवस्था 11 व्या स्थानावर होती आणि आता ती 5 व्या स्थानावर आहे. तसेच, मोदीजींनी अर्थव्यवस्था सर्वसमावेशक करण्यासाठी पावले उचलली आहेत.
आर्थिक विकास दर
गुरुवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर ७.६ टक्के राहिला. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत तो 6.2 टक्के होता. शाह म्हणाले, “खादीच्या विक्रीत तिप्पट वाढ म्हणजे लाखो आणि करोडो लोकांसाठी रोजगार निर्मिती. जेव्हा तुम्ही त्यांना नोकऱ्या देता, त्यांना स्वावलंबी बनवता, त्यांच्या घरात आनंद पसरवता, तेव्हा जीडीपीचे वाढते आकडे मानवतावादी ठरतात. हे उपाय केवळ जीडीपी वाढवत नाहीत तर करोडो लोकांना आत्मविश्वास, स्वावलंबन आणि आनंद देखील देतात.
वोकल फॉर लोकल
तसेच यावेळी ते म्हणाले की मोदींनी खादीची कल्पना केवळ पुनरुज्जीवित केली नाही तर ती सामान्य लोकांमध्ये अधिक लोकप्रिय केली. शहा म्हणाले, “मोदींनी ‘वोकल फॉर लोकल’ या घोषणेला स्वदेशी आणि रोजगाराशी जोडण्याचे काम केले. त्यांच्या जिद्दीमुळे दुबळी खादी चळवळ आज नव्या आयामांना स्पर्श करत आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.