नवी दिल्ली । जर तुम्ही सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे म्हणजेच SBI चे ग्राहक असाल तर तुम्हाला डेबिट कार्डचा पिन जनरेट करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही, म्हणजेच तुम्ही हा पिन घरबसल्या वापरु शकता. ग्राहक हा पिन फक्त एका फोन कॉलने मिळवू शकतात.
अलीकडेच SBI ने ट्विट केले होते की, “तुम्ही टोल-फ्री IVR सिस्टीमद्वारे डेबिट कार्ड पिन किंवा ग्रीन पिन सहजपणे जनरेट करू शकता. 1800 1234 वर कॉल करण्यास अजिबात संकोच करू नका.”
तुम्ही SBI डेबिट कार्ड पिन अशा प्रकारे जनरेट करू शकता-
>> सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर वरून टोल फ्री क्रमांकावर कॉल करावा लागेल.
>> कॉल आल्यावर, तुम्हाला एटीएम/डेबिट कार्ड संबंधित सेवांसाठी 2 दाबावे लागेल.
>> आता पिन तयार करण्यासाठी 1 दाबा.
>> IVR तुम्हाला प्रकारे मोबाइल क्रमांकावरून कॉल करण्यासाठी 1 दाबण्यास सांगेल किंवा ग्राहक एजंटशी बोलण्यासाठी तुम्हाला 2 दाबण्यास सांगितले जाईल.
>> IVR तुम्हाला तुमच्या ATM कार्डचे शेवटचे 5 अंक टाकण्यास सांगेल.
>> शेवटचे 5 अंक निश्चित करण्यासाठी 1 दाबावे लागेल.
>> तुमच्याकडून काही चूक झाल्यास, एटीएम कार्डचे शेवटचे 5 अंक पुन्हा एंटर करण्यासाठी पुन्हा 2 दाबा.
>> यानंतर तुम्हाला तुमच्या खाते नंबरचे शेवटचे 5 अंक टाकण्यास सांगितले जाईल.
>> एंटर केलेले नंबर बरोबर असल्यास 1 दाबा अन्यथा खाते क्रमांकाचे शेवटचे 5 अंक पुन्हा एंटर करण्यासाठी 2 दाबा.
>> आता तुम्हाला तुमचे बर्थ ईअर टाकावे लागेल.
>> ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचा ग्रीन पिन तयार होईल.