हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी असलेल्या LIC कडून नागरिकांसाठी अनेक प्रकारचे प्लॅन ऑफर केले जातात. जर आपल्याला रिटायरमेंटनंतरच्या खर्चाची काळजी वाटत असेल तर LIC ची New Jeevan Shanti योजना आपल्यासाठी खूपच फायदेशीर ठरू शकेल. आता या योजनेअंतर्गत पॉलिसीधारकांना जास्त एन्युइटी दिली जाणार आहे. मात्र 5 जानेवारी किंवा त्यानंतर प्लॅन घेतलेल्यांनाच याचा फायदा मिळेल.
याबरोबरच, LIC कडून या प्लॅनच्या किंमतीतही वाढ केली गेली आहे. त्यानंतर आता पॉलिसीधारकांना 1,000 रुपयांच्या खरेदी किंमतीला 3 ते 9.75 रुपयांचे इंसेंटिव्ह मिळेल. मात्र हे इंसेंटिव्ह खरेदी किंमत आणि निवडलेल्या डिफरमेंट कालावधीवर आधारित असेल.
नवीन जीवन शांती योजनेबाबत जाणून घ्या
LIC च्या या योजनेद्वारे रिटायरमेंटनंतरच्या आयुष्यासाठी उत्पन्नाचा स्रोत सुनिश्चित केला जातो. हे लक्षात घ्या कि, हा एक एन्युइटी प्लॅन आहे. तसेच हा प्लॅन घेतानाच आपल्या पेन्शनची रक्कम निश्चित केली जाईल. याबरोबरच आपल्याला दरमहा पेन्शनची सुविधा देखील मिळेल.
यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत
नवीन जीवन शांती योजना ही सिंगल प्रीमियम योजना आहे. या योजनेत 2 प्रकारचे पर्याय मिळतात. पॉलिसीधारक सिंगल लाईफ आणि जॉइंट लाईफ डिफर्ड एन्युइटी यापैकी एकाची निवड करता येऊ शकेल. यातील पहिल्या पर्यायामध्ये, फक्त एका व्यक्तीलाच पेन्शन प्लॅन खरेदी करता येईल. डिफर्ड एन्युइटी फॉर सिंगल लाइफमध्ये, जेव्हा पॉलिसीधारकाचा मृत्यू होतो. तेव्हा नॉमिनी व्यक्तीच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातील. तसेच डिफर्ड एन्युइटी फॉर जॉइंट लाईफमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर दुसऱ्याला पेन्शनची सुविधा मिळेल.
अशा प्रकारे मिळेल 11,192 रुपये मासिक पेन्शन
या प्लॅनमध्ये किमान खरेदीची किंमत 1.5 लाख रुपये असेल. यामध्ये किमान 12,000 रुपये एन्युइटी मिळेल. त्याचप्रमाणे जास्तीच्या खरेदी किंमतीसाठी कोणतीही मर्यादा नाही. डिफर्ड एन्युइटी फॉर सिंगल लाइफच्या बाबतीत, 10 लाख रुपयांची पॉलिसी खरेदी करून 11,192 रुपयांची मासिक पेन्शन मिळू शकेल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://licindia.in/Products/Pension-Plans/LIC-s-New-Jeevan-Shanti-(Plan-No-858)-(UIN-512N338
हे पण वाचा :
FD Rates : ग्राहकांना बँकांकडून मिळाली नवीन वर्षाची भेट, FD वर देत आहेत जबरदस्त ऑफर
Doorstep Banking म्हणजे काय ??? त्याचा फायदा कोणाकोणाला मिळेल ते जाणून घ्या
अर्थसंकल्पापूर्वी करदात्यांना सरकारकडून भेट !!! आता ‘या’ लोकांना ITR मधून मिळणार सूट
Car च्या डिक्कीत ठेवा ‘हे’ Device; पंक्चर टायर एका मिनिटांत होईल ठीक
‘या’ Penny Stock ने गेल्या 20 महिन्यांत गुंतवणूकदारांच्या भांडवलात केली 150 पटींनी वाढ