हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office : जर आपल्याला सुरक्षित गुंतवणुकीसह चांगला रिटर्न हवा असेल तर पोस्ट ऑफिस हा एक चांगला पर्याय ठरू शकेल. Post Office च्या लहान बचत योजना हे गुंतवणुकीचे चांगले साधन आहे. यामध्ये अगदी कमी पैशांत गुंतवणूक करून चांगले पैसे मिळतात. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट हे अशाच एका पोस्ट ऑफिस योजनेचे नाव आहे. तसेच ज्यामध्ये चांगला रिटर्न देखील मिळतो.
एकूणच काय तर या योजनेद्वारे अगदी कमी पैशात गुंतवणूक सुरू करता येते. याशिवाय यामध्ये आपले पैसे देखील पूर्णपणे सुरक्षित राहतात. या योजनेची खास गोष्ट अशी की, यामध्ये दरमहा फक्त 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरु करता येईल. यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. पोस्ट ऑफिस आरडी डिपॉझिट खाते हे चांगल्या व्याजदर देणारी सरकारी हमी असललेली योजना आहे. Post Office
किती व्याज मिळेल ???
Post Office चे RD खाते 5 वर्षांसाठी उघडता येते. यामध्ये प्रत्येक तिमाहीत (वार्षिक दराने) जमा केलेल्या पैशावर व्याज मोजले जाते. मग ते प्रत्येक तिमाहीच्या शेवटी चक्रवाढ व्याजासह आपल्या खात्यामध्ये जोडले जाते. इंडिया पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटनुसार, सध्या RD स्कीमवर 5.8 टक्के व्याज दिले जात आहे.
हे लक्षात घ्या कि, दर तिमाहीला केंद्र सरकारकडून आपल्या सर्व लहान बचत योजनांचे व्याजदर जाहीर केले जातात. जर आपण या स्कीममध्ये दरमहा 10 हजार रुपये 10 वर्षांसाठी गुंतवले तर मॅच्युरिटीवर 16,26,476 लाख रुपये मिळतील.
RD खात्याच्या काही खास गोष्टी जाणून घ्या
यामध्ये जर RD चा हप्ता वेळेवर जमा केला गेला नाही तर दंड भरावा लागेल. तसेच हप्ता भरण्यास उशीर झाल्यास दरमहा एक टक्का दंड भरावा लागेल. यासोबतच सलग 4 हप्ते जमा न केल्यास आपले खाते बंद केले जाईल. मात्र, खाते बंद झाल्यास, ते पुढील 2 महिन्यांमध्ये पुन्हा ऍक्टिव्ह केले जाऊ शकते. Post Office
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, आजचे दर पहा
Card Payment : ATM, डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये काय फरक आहे ते समजून घ्या
Bank FD : आता ‘या’ 2 मोठ्या बँकांनी देखील FD वरील व्याजदरात केली वाढ !!!
‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!
YES Bank च्या ग्राहकांना मुदतीआधी FD बंद केल्यास द्यावा लागणार जास्त दंड !!!