हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Aadhar Card : सध्याच्या काळात आधार कार्ड हे महत्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. तसेच देशातील सर्व लोकांसाठी आधार कार्ड हे बंधनकारक देखील केले आहे. मात्र आपल्यातील अनेक लोकांना अजूनही निळ्या आधार कार्डबाबत फारशी माहिती नाही. तर सर्वांत आधी त्याविषयीची माहिती जाणून घेउयात… हे जाणून घ्या कि, पाच वर्षांखालील मुलांच्या आधार कार्डचा रंग निळा आहे. म्हणूनच ब्लू आधार कार्ड अथवा बाल आधार कार्ड असेही म्हणतात. तसेच हे Aadhar Card बनवण्यासाठी फारशी माहिती देखील लागत नाही किंवा बायोमेट्रिकचीही गरज भासत नाही. म्हणूनच ते घरबसल्या अगदी सहजपणे बनवता येईल.
UIDAI ने प्रक्रिया केली सुलभ
पाच वर्षांखालील मुलांसाठीचे Aadhar Card बनवण्याची प्रक्रिया युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आणखी सुलभ केली आहे. याआधी बर्थ सर्टिफिकेटची वाट पहावी लागत असे. मात्र आता बर्थ सर्टिफिकेटशिवाय देखील मुलाचे आधार कार्ड घरबसल्या बनवता येते.
या Aadhar Card साठीची प्रक्रिया जाणून घ्या
सर्वांत आधी http://www.UIDAI.gov.in या अधिकृत साइटवर जा.
त्यानंतर Aadhar Card साठी लिंकवर क्लिक करा.
आता मुलाचे नाव, पालकाचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी अशी माहिती भरा.
आता मुलाचे जन्म ठिकाण, संपूर्ण पत्ता, जिल्हा आणि राज्याची माहिती भरा.
ऑनलाइन ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर फक्त आधार कार्ड काढण्यासाठी UIDAI केंद्रावर जावे लागेल.
यासाठी आपल्याला ऍडव्हान्स अपॉइंटमेंट घेता येईल. अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी, फिक्स अपॉइंटमेंटच्या पर्यायावर जा.
आता आपल्याला हवी असलेली तारीख आणि वेळ आणि जवळचे UIDAI चे केंद्र निवडा.
आता मुलाचे नाव, जन्मतारीख यासारखी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि नंतर फॉर्म सबमिट करा.
हे पण वाचा :
FD Rates : ‘या’ NBFC ने FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन दर तपासा
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 247 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे नवे दर
DCB Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, आता FD वर मिळेल 8.35% व्याज
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा