आजच आपले जन धन खाते आधारशी करा लिंक, तुम्हाला 5000 रुपये कसे मिळतील ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । प्रधानमंत्री जन धन योजने (Pradhan Mantri Jan Dhan Yojana) अंतर्गत देशातील गरिबांचे खाते बँका, टपाल कार्यालये आणि राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये झिरो बॅलन्सवर उघडले जाते. प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) अंतर्गत ग्राहकांना खाती उघडता येतात. यामध्ये तुमच्या खात्यात जर काही शिल्लक जरी नसेल तरीही तुम्ही 5 हजार रुपये काढू शकता. या खात्यासह कोणती आकर्षक वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत आणि हे खाते कसे उघडले जाईल ते जाणून घेउयात. इथे हे देखल लक्षात घेण्यासारखे आहे की ज्या लोकांचे खाते आधारशी लिंक केले जाईल केवळ त्यांनाच या खात्यासह उपलब्ध सुविधांचा लाभ मिळेल.

अशा प्रकारे आपल्याला 5 हजार रुपये काढण्याची सुविधा मिळते
पंतप्रधान जनधन खात्यावर ग्राहकांना 5000 रुपयांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते. या ओव्हरड्राफ्टच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. याशिवाय PMJDY खात्यालाही आधार कार्डशी लिंक केले पाहिजे. या योजनेंतर्गत पंतप्रधान मोदींचा उद्देश प्रत्येक कुटुंबासाठी बँक खाते उघडणे हा होता. या जन धन योजनेंतर्गत आपण आपल्या 10 वर्षाखालील मुलाचे देखील खाते उघडू शकता.

ओव्हरड्राफ्ट सुविधा काय आहे ते जाणून घ्या
ओव्हरड्राफ्ट सुविधा ही एक अशी सुविधा आहे ज्या अंतर्गत खातेदार त्याच्या खात्यात पैसे नसतानाही खात्यातून पैसे काढू शकतो. म्हणजे खातेदारांच्या खात्यातील शिल्लक शून्य असेल. जर कोणतेही पंतप्रधान जनधन खाते हे आधार कार्डशी जोडलेले नसेल तर त्या खात्यावर ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ मिळणार नाही.

ओव्हरड्राफ्ट सुविधा
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी खातेधारकास पहिल्या 6 महिन्यांपर्यंत खात्यात पुरेसे पैसे ठेवावे लागतील आणि यावेळी त्यांनी वेळोवेळी या खात्यातून व्यवहारही चालू ठेवावे लागतील. अशा खातेदारांना रुपे डेबिट कार्डे दिली जातात, ती सहजपणे व्यवहारासाठी वापरली जाऊ शकतात.

खाते उघडण्यासाठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक आहेत
आधार कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅनकार्ड, मतदार कार्ड, NREGA जॉब कार्ड, अधिकृतता पत्र, नाव, पत्ता आणि आधार क्रमांक असलेले पत्र, खाते उघडण्याचे अटेस्टेड फोटो असलेले गॅजेटेड अधिकाऱ्याने दिलेले पत्र.

नवीन खाते उघडण्यासाठी ‘हे’ करावे लागेल
जर आपणास आपले नवीन जनधन खाते उघडायचे असल्यास जवळच्या बँकेत जाऊन आपण हे काम सहजपणे करू शकता. यासाठी तुम्हाला बँकेत एक फॉर्म भरावा लागेल. त्यामध्ये नाव, मोबाइल नंबर, बँकेच्या शाखेचे नाव, अर्जदाराचा पत्ता, नामनिर्देशित, व्यवसाय / रोजगार आणि वार्षिक उत्पन्न आणि अवलंबून असलेल्यांची संख्या, एसएसए कोड किंवा प्रभाग क्रमांक, गाव कोड किंवा शहर कोड इत्यादी माहिती द्यावी लागेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.