PM Kisan च्या 11 वा हफ्त्याचे पैसे मिळवण्यासाठी ‘या’ नंबर करा तक्रार !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan : केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी अनेक योजना चालविल्या जातात. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही त्यापैकीच एक आहे. या योजनेंतर्गत सरकारकडून दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. आतापर्यंत शेतकऱ्यांना या योजनेचे 11 हप्ते देण्यात आले आहेत. मात्र, अजूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यात या हफ्त्याचे पैसे आलेले नाहीत.

What is PM-Kisan Samman Nidhi Yojana? Check Registration Process,  Eligibility, Documents Required, Toll-free Number and More

मात्र इथे हे लक्षात घ्या कि, PM Kisan योजनेचे पैसे खात्यात न येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. शेतकऱ्याने दिलेल्या कागदपत्रांमध्ये काही कमतरता असेल तर पैसे येणार नाहीत. अनेकवेळा शेतकऱ्यांचे बँक खाते बंद असते त्यामुळे देखील पैसे येत नाहीत. म्हणूनच, जर आपल्यालाही पीएम किसानचा 11 वा हप्ता मिळालेला नसेल तर सर्वात आधी आपले ऑनलाइन स्टेट्स तपासा. जर आपण दिलेली सर्व कागदपत्रे योग्य असतील तर त्याबाबत  तक्रार करून आपल्याला पैसे मिळू शकतील.

Pmkisan.gov.in Registration 2022 New Farmer Online Form, Login

इथे तक्रार करता येईल ???

यावेळी बहुतेक लोकांना 11 व्या हप्त्याचे पैसे मिळालेले नाहीत. त्यासाठी आपल्याला PM Kisan चा हेल्पलाइन नंबर 011-24300606 वर कॉल करून तक्रार नोंदवता येईल. याशिवाय खालील नंबरद्वारे देखील तक्रार नोंदवता येईल –

पीएम किसान टोल फ्री नंबर : 18001155266

पीएम किसान हेल्पलाइन नंबर : 155261

पीएम किसान लँडलाइन नंबर : 011—23381092, 23382401

पीएम किसानची नवीन हेल्पलाइन: 011-24300606

पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन नंबर : 0120-6025109

ई-मेल आयडी :  [email protected]

PM Kisan eKYC, KYC update, Last date, OTP Solution

अशा प्रकारे e-KYC करा

आता PM Kisan योजनेच्या लाभार्थ्यांसाठी e-KYC करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे जे शेतकरी e-KYC करणार नाहीत, त्यांना पीएम किसानचा पुढील हप्ता दिला जाणार नाही. हे लक्षात घ्या कि, e-KYC करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे. आता शेतकऱ्यांना हे काम घर बसल्या  स्मार्टफोनच्या मदतीने करता येईल. याशिवाय, ते कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन बायोमेट्रिक ईकेवायसी देखील मिळवू शकतात.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://www.pmkisan.gov.in/

हे पण वाचा : 

‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना 1 वर्षात दिला 960 टक्के रिटर्न !!!

LPG price : सिक्योरिटी डिपॉझिट्समध्ये वाढ झाल्याने कमर्शिअल LPG कनेक्शन महागले !!!

Gold Price Today : सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात झाली वाढ, नवीन दर तपासा

Pre-Approved Loan म्हणजे काय ??? ते घ्यावे की नाही ??? समजून घ्या

आता Post Office च्या लहान बचत योजनांवरील व्याजदर देखील वाढणार !!!

Leave a Comment