हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वांत मोठी कंपनी असलेल्या LIC ने ग्राहकांच्या सोयीसाठी अनेक पॉलिसी सुरु केल्या आहेत. ज्यामध्ये ग्राहकांना अनेक फायदे दिले जातात. सध्याच्या काळात पालकांच्या आर्थिक नियोजनामध्ये मुलांच्या भविष्याचाही विचार केला जातो आहे. अनेक लोकं मुलांचे शिक्षण, लग्न आणि इतर खर्चासाठी कुठे ना कुठे गुंतवणूक करतात.
मुलांच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन LIC कडून एक योजना तयार करण्यात आली आहे. तर LIC च्या या नवीन योजनेचे नाव आहे ‘New Children’s Money Back Plan’.
चला तर मग ‘या’ पॉलिसीबद्दलच्या काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात…
>> ही पॉलिसी घेण्यासाठीचे किमान वय 0 वर्षे आहे.
>> ही पॉलिसी घेण्यासाठीचे जास्तीत जास्त वय 12 वर्षे आहे.
>> त्याची किमान विमा रक्कम रु 10,000 आहे.
>> जास्तीत जास्त विमा रकमेवर कोणतीही मर्यादा नाही.
>> प्रीमियम वेवर बेनिफिट राइडर ऑप्शन देखील उपलब्ध आहे.
मॅच्युरिटी कालावधी : LIC च्या New Children’s Money Back योजनेची एकूण मुदत 25 वर्षे आहे.
मनी बॅक इंस्टॉलमेंट : या अंतर्गत, LIC कडून बेसिक सम इंश्योर्डच्या 20-20 टक्के रक्कम 18 वर्ष, 20 वर्षे आणि 22 व्य वर्षी मुलाला दिली जाईल.
उर्वरित 40 टक्के रक्कम : पॉलिसीधारकाची 25 वर्षे पूर्ण झाल्यावर दिली जाईल. यासह, सर्व थकित बोनस देखील दिले जातील.
मॅच्युरिटी बेनिफिट : या पॉलिसीच्या मॅच्युरिटीच्या वेळी (पॉलिसी टर्म दरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाला नसल्यास) पॉलिसीधारकाला उर्वरित 40 टक्के रक्कम बोनससह दिली जाईल.
डेथ बेनिफिट : या पॉलिसीच्या कालावधी दरम्यान जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर निहित साध्या प्रत्यावर्ती बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनस व्यतिरिक्त विमा रक्कम दिली जाते. मात्र इथे हे लक्षात ठेवा कि, डेथ बेनिफिट पेमेंट हे एकूण प्रीमियमच्या 105 टक्क्यांपेक्षा कमी नसावा.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://licindia.in/Products/Insurance-Plan/LIC-s-NEW-CHILDREN-S-MONEY-BACK-PLAN-(2)
हे पण वाचा :
Stock Market : ‘या’ 5 शेअर्सनी एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला भरघोस नफा !!!
HDFC Bank च्या ग्राहकांना धक्का !!! बँकेने आजपासून लागू केला हा नवा नियम
PPF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी; सरकारने केले ‘हे’ मोठे बदल
TVS Ronin 225 : बुलेटला टक्कर देणार TVS ची Ronin 225; पहा वैशिष्ट्ये आणि किंमत
Investment : फक्त 1000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा लाखो रुपये, कसे ते जाणून घ्या